Breaking News
Home / बातम्या / भारतीयांच्या नावावर नोंद आहेत हे मजेशीर १० गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

भारतीयांच्या नावावर नोंद आहेत हे मजेशीर १० गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

आपल्या भारतीयांना विश्वविक्रम प्रस्थापित रस असतो. केवळ खेळाच्या मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेरही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अनेक विश्वविक्रमांवर भारतीयांची नावे कोरलेली पाहायला मिळते. परंतु गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार भारतीयांच्या नावावर अनेक मजेशीर असे विश्वविक्रम नोंद देखील आहेत. पाहूया त्यापैकी १० मजेशीर रेकॉर्डस्..

१) सर्वात मोठा लाडू : जगातील सर्वात मोठा लाडू बनवण्याचा विक्रम भारतीयांच्या नावावर असून आंध्रप्रदेशातील पीव्हीव्हीएस मल्लिकार्जुन राव यांनी हा लाडू बनवला होता, ज्याचे वजन २९४६५ किलोग्रॅम होते. २) सर्वात मोठी चपाती : जगातील सर्वात मोठी चपाती बनवण्याचा विक्रम जामनगर येथील दगडूशेठ गणपती सार्वजनिक उत्सवाच्या नावावर आहे. त्यांनी १४५ किलोग्रॅमची चपाती बनवली होती. ३) सर्वात मोठी बिर्याणी : २० कुक एकत्र येऊन त्यांनी दिल्लीत बनवलेली १४००० किलोग्रॅम बिर्याणी ही जगातली सर्वात मोठी बिर्याणी ठरली.

४) सर्वात लांब पगडी : जगात सर्वात लांब पगडी परिधान करण्याचा विक्रम पंजाबमधील पटियालाच्या अवतार सिंह मौनी यांच्या नावावर आहे. त्यांची पगडी ६४५ मित्र लांब आणि जवळपास ४५ किलोग्रॅमची होती. ही पगडी घालायला त्यांना ६ तास लागायचे. ५) सर्वात बुटकी महिला : नागपूरची जोती आमगे ही जगातली सर्वात बुटकी महिला असून तिची उंची केवळ २ फूट ०.६ इंच इतकी आहे.

६) सर्वात लांब मिशा : राजस्थानच्या राम सिंह चौहान यांच्या मिशा नथ्थूलालपेक्षाही मोठ्या असून त्या जगातील सर्वात लांब मिशा म्हणून नोंद आहेत. त्यांच्या मिशनची लांबी तब्बल १४ फूट आहे. ७) नाकाने सर्वात वेगवान टायपिंग : वाचायला जरा विचित्र वाटेल, परंतु हैद्राबादच्या खुर्शीद हुसेन यांच्या नावावर नाकाने सर्वात जलदरीत्या टायपिंग करण्याचा विक्रम नोंद आहे. त्यांनी ४७ सेकंदात १०३ शब्द टाईप केले होते.

८) सर्वात लांब नखे : पुण्याच्या श्रीधर चिल्लाल यांची नखे जगातील सर्वात लांब नखे असून त्याची लांबी २९ फूट १० इंच होती. ९) सर्वाधिक किडे खाण्याचा विक्रम : थोडं विचित्र आहे, पण कोईमतूरच्या जॉन पीटर नाश्त्यात गांडूळ-डोसा, न्याहारीत डाळ-पतंग आणि रात्री १०-२० पाळी खातात. १०) सर्वात महागडा सूट : प्रधानमंत्री मोदींनी २०१६ मध्ये परिधान केलेला सूट हा जगातील सर्वात महागडा सूट असून त्याची किंमत साडेचार कोटी रुपये होती.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *