
जगभरात कोरोनाने एकच हाहाकार उडाला आहे. कोरोना नावाच्या रोगाने सगळं जग एकाच जाग्यावर थांबल्यासारखे झाले आहे. बऱ्याच देशांमध्ये आता लसीकरणाचा वेग पण वाढवला आहे. ज्या देशांमध्ये लसीकरण झाले आहे त्या ठिकाणी निर्बंध पण कमी केले गेले आहेत.
लस घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात आणि त्यामुळे कोरोना विषाणूशी लढायला बळ मिळते. लस घेतल्यानंतर पण बऱ्याच जणांच्या मनात भीती निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. शरीरात लस घेतल्यानंतर अँटीबॉडीज तयार होतात पण त्या किती दिवसासाठी राहतात याबद्दल अजून पर्यंत संभ्रम होता.
एम्स रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर संदीप मिश्रा यांनी म्हटले आहे की, लस घेतल्यानंतर तयार झालेल्या अॅंटीबाॅडिज 6 महिन्यासाठी प्रभाव करतात. त्यानंतर लसीचा प्रभाव काही काळ राहू शकतो. मात्र लसीचा पूर्ण असर जवळपास 9 महिने टिकतो. लसीकरणाचा प्रभाव कोरोना आटोक्यात आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असून सध्या लसीचे दोन डोस सर्व लोकांना दिले जात आहेत.
यानंतर कदाचित एक वर्षानंतर बूस्टर डोसही दिला जाऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी लस घेतल्यानंतर पण गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यामुळे काही जणांनी लस घेतली नसल्याचे सांगितले आहे. काही लोकांना लस घेतल्यानंतर त्रास झाल्याचे पण दिसून आले आहे.
लसीकरणाबाबत ग्रामीण भागात अजून जनजागृती झालेली नाही. त्यामुळे काही प्रमाणात लस घेण्याचे प्रमाण कमी दिसून आले आहे. लसीकरणासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न होताना पण दिसून येत आहेत. काही कंपन्यांनी तर लस घेतलेल्या ग्राहकांना मोठा प्रमाणावर डिस्काउंट पण दिला आहे.