Breaking News
Loading...
Home / आरोग्य / या ३० रुग्णालयांची झाली कोरोना रुग्णालय म्हणून घोषणा, बघा तुमच्या जिल्ह्यात कोणतं आहे रुग्णालय

या ३० रुग्णालयांची झाली कोरोना रुग्णालय म्हणून घोषणा, बघा तुमच्या जिल्ह्यात कोणतं आहे रुग्णालय

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लॉकडाऊन असूनही लोकरस्त्यावर येत असल्याचे चित्र महाराष्ट्रात आहे. त्यामुळे कुठे तरी महाराष्ट्र आता सामाजिक संक्रमणाच्या उंबरठ्यावर येऊन पोहचला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच योग्य ती खबरदारी घेतली होती. त्यामुळे कुठे तरी हा आकडा नियंत्रणात असल्याचे चित्र आहे.

मुंबईत मात्र रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी असून मुंबईत राज्यात सर्वाधिक बळी गेले आहेत. मुंबईच्या धारावीसह इतर काही झोपडपट्टी भागात देखील कोरोनाचे रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली आहे.

Loading...

कोरोनाला रोखण्यासाठी आज आरोग्य विभागाने ३० विशेष कोरोना रुग्णालयाची घोषणा केली आहे. राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषीत केली आहेत. या ३० रुग्णालयात आता केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपी यांनी याविषयी माहिती दिली.

राज्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता हे महत्वाचे पाउल सरकारने टाकले आहे. राज्यात चाचण्यांची सुविधा वाढवितानाच आवश्यकता भासल्यास रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष करण्यात आले आहेत. या ३० विशेष कोरोना रुग्णालयात २३०५ बेड कोरोनाबाधीतांसाठी उपलब्ध झाले आहेत.

बघूया आरोग्य खात्याने नेमके कोणते रुग्णालय हे कोरोना विशेष रुग्णालय म्हणून घोषित केले-(कंसात उपलब्ध बेड)

ठाणे- जिल्हा रुग्णालय, टी.बी बिल्डींग (१००), मीरा भाईंदर- पंडीत भीमसेन जोशी रुग्णालय (१००), वाशी- सामान्य रुग्णालय (१२०), कल्याण डोबिवली म.न.पा.- शास्त्री नगर दवाखाना (१००),

रायगड- पनवेल उपजिल्हा रुग्णालय (१००),

नाशिक- कुंभमेळा बिल्डींग व महानगरपालिका कठडा हॉस्पीटल अनुक्रमे (१००) (७०), नंदूरबार- डोळ्यांचा दवाखाना (५०), धुळे- जिल्हा रुग्णालया शहारातील इमारत (५०),

अहमदनगर- जिल्हा रुग्णालय (१००), पुणे- जिल्हा रुग्णालय, औंध (५०), सातारा- सामान्य रुग्णालय (६०),

सिंधुदूर्ग- नविन इमारत एएमपी फंडेड (७५), रत्नागिरी- सामान्य रुग्णालय व कळंबोळी उपजिल्हा रुग्णालय अनुक्रमे (१००) (५०),

औरंगाबाद- जिल्हा रुग्णालय (१००), हिंगोली- जिल्हा रुग्णालय (१००), हिंगोली- कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय (५०), लातूर- उदगीर उपजिल्हा रुग्णालय (५०), उस्मानाबाद- जिल्हा रुग्णालय, नविन इमारत (१००), उमरगा उपजिल्हा रुग्णालय टीसीयू बिल्डींग (५०) आणि तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय नविन इमारत (५०), नांदेड- जिल्हा रुग्णालय जुने (५०) आणि मुखेड उपजिल्हा रुग्णालय (५०).

अमरावती- विशेषोपचार रुग्णालय नविन इमारत (१००),वाशीम- जिल्हा रुग्णालय, डीईआयसी इमारत (५०), बुलढाणा-स्त्री रुग्णालय नविन इमारत (१००), वर्धा- सामान्य रुग्णालय (५०), भंडारा- सामान्य रुग्णालय एएमसीएच विंग नविन इमारत (८०) आणि गडचिरोली- जिल्हा रुग्णालय (१००)

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *