प्रेरणादायीबातम्या

चेहऱ्यावर सहा टाके पडले असताना खेळला ‘हा’ खेळाडू; भारतीय प्रेक्षकांना त्याच्यावर आहे गर्व

ऑलिम्पिक स्पर्धाची चुरस दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून आले आहे. स्पर्ध्येच्या पहिल्याच दिवशी मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकून इतिहास घडवला. टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारतीय संघातील खेळाडूंनी दिवसेंदिवस चुरस वाढवली आहे. भारताच्या ९१ किलो वजन गटात खेळणाऱ्या बॉक्सर सतीश कुमारचा पराभव झाला आहे.

त्याचा पराभव उझबेकिस्तानच्या विश्वविजेता आणि बखोदिर जलोलेणे याने केला आहे. सतीश कुमार मागच्या सामन्यात जखमी झाला होता. त्यामुळे सतीश आता खेळणार का नाही हे सांगता येत नव्हते. पण तरी जिद्दीने तो बॉक्सिंग रिंग मध्ये उतरला. सतीशला सात टाके पडले होते.

तो जेव्हा जमैकाच्या खेळाडूविरुद्ध खेळत होते तेव्हा त्याला जवळपास सात टाके पडले होते. त्या सामन्यामध्ये सतीशच्या डोळ्याला आणि चेहऱ्याला दुखापत झाली होती. त्याने तरी तो सामना ४-१ अशा फरकाने जिंकला होता. भारतीय बॉक्सर लवकर बाहेर पडल्याने सतीशकडून अपेक्षा होत्या.

पण त्यांनी निराशा केल्यानंतर सतीश याने मोठ्या प्रमाणावर संघर्ष केला. गंभीर जखमी असताना पण त्याने धीराने खेळ केला. सतीशने मोठ्या धीराने खेळ करून सामना खेळून काढला. सतीशच्या तोंडातून सामन्याच्या वेळी रक्त येत होते. त्यामुळे तो सामना जिंकतो की नाही याकडे लागून राहिले होते.

सतीशने सामना खेळून काढला. पण उझबेकिस्तानचा बॉक्सर त्याच्यावर भारी पडला. सतीशच्या नाक तोंडातून सामन्याच्या वेळी रक्त येत होते. त्यामुळे त्याच्या धाडसाचे सर्वानी कौतुक केले आहे. भारतीय प्रेक्षकांना त्याच्यावर अभिमान असेलच असे त्यातून दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button