Breaking News
Loading...
Home / नवीन खासरे / चार मित्रांनी मिळून विकत घेतली जुनाट हवेली; आज कमवत आहेत तब्ब्ल एका रात्रीचे एक लाख रुपये

चार मित्रांनी मिळून विकत घेतली जुनाट हवेली; आज कमवत आहेत तब्ब्ल एका रात्रीचे एक लाख रुपये

जुन्या इमारती किंवा घरांबद्दल अनेकांना विशेष आकर्षण असते. मात्र एखाद्या जुन्या इमारतीची डागडुजी करण्यासाठी खर्च देखील मोठा येतो. इमारत १०, २० वर्षांपूर्वीची असेल तर खर्च कमी येतो मात्र जर तीच इमारत ५० किंवा १०० वर्षांपूर्वीची असेल तर तिला जास्तीचा खर्च नक्कीच येतो. एका जुन्या इमारतीचे नवीन काळातील आलिशान बंगल्यामध्ये रूपांतर करून चार मित्र एका दिवसाचे चक्क १ लाख रुपये भाडे आकारत आहेत.

श्रीलंकेतील वेलिगामा शहराजवळच जीर्णावस्थेत असलेली १०० वर्ष जुनी हवेली चार मित्रांनी विकत घेतली होती. तयानंतर त्यांनी या हवेलीचे रूपांतर एका आलिशान बंगल्यात केले. आज या हवेलीमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी १ लाख रुपये इतके भाडे आकारले जाते. या हवेलीला हलाला कांडा हवेली असे देखील म्हटले जाते.

Loading...

अत्यंत जुनाट आणि जीर्ण झालेल्या हलाला कांडा हवेलीवर सर्वप्रथमी २०१० साली इंटिरियर डिझाइनर डीन शार्प यांचे लक्ष गेले. त्यांनी त्यांच्या ३ मित्रांबरोबर मिळून या हवेलीला विकत घेतले आणि त्याचे नूतनीकरण सुरु केले. नूतनीकरणाआधी जीर्ण आणि पडक्या अवस्थेत असलेली हवेली आता आलिशान बंगल्यात रूपांतरित झाली आहे.

या हवेलीची एक विशेष रंजक कथा आहे. १९९२ मध्ये एक धनाड्य चहा आणि कॉफीच्या मळ्यांच्या मालकाने आपल्या मुलाच्या पत्नीसाठी खास ही हवेली बनवली होती. स्थानिक लोक या हवेलीला जुगनू हिलच्या नावाने ओळखतात. आपल्या ऐन भरतील दिवसांमध्ये हलाला कांडा हवेलीने इथिओपियन सम्राट हैली सेलासी, महान ऑस्ट्रेलियन क्रिकेटर कीथ मिलर यांच्यासारख्या पाहुण्यांचे यजमानपद भूषविले होते.

या हवेलीबाबत इंटिरियर डिझाइनर डीन शार्प यांनी सांगितले की जेव्हा त्यांनी ही वास्तू पहिल्यांदा पहिली तेव्हा ती अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये होती. पडक्या हवेलीच्या छतावर गवत उगवले होते. छतांवर वटवाघुळांचे साम्राज्य उभे झाले होते. याशिवाय स्वयंपाक घरातील टाईल्स तुटून पडल्या होत्या.

आता नूतनीकरणानंतर हवेलीमध्ये ५ बेडरुमव्यतिरिक्त एक शानदार किचन, ओपनयार्डकोर्ट देखील आहे. हलाला कांडा हवेलीमध्ये २३ मीटरचा एक स्विमिंगपूल देखील आहे. हवेलीला जुन्या काळातील दुर्मिळ वस्तुंनी सजवण्यात आले आहे. हवेलीचे नवीन डिझाईन करण्यासाठी प्रसिद्ध आर्किटेक्ट रॉस लोगी यांना कामावर ठेवण्यात आले होते.

Loading...
Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *