Breaking News
Loading...
Home / प्रेरणादायी / या ७ सेलिब्रिटींनी नाकारल्या करोडोंच्या जाहिराती, कारण पाहून कौतुक कराल..

या ७ सेलिब्रिटींनी नाकारल्या करोडोंच्या जाहिराती, कारण पाहून कौतुक कराल..

टीव्हीवर येणाऱ्या जाहिरातींवरच लोक बाहेर काय खरेदी करणार हे अवलंबून असते. विशेषत: जर ती जाहिरात एखाद्या सेलिब्रिटीने केली असेल. म्हणूनच बहुतेक जाहिरातींसाठी सेलिब्रिटींना संपर्क साधला जातो, जेणेकरून त्यांचे चाहते जास्तीत जास्त प्रमाणात त्या प्रोडक्टसचा वापर करतील. तरीसुद्धा असेही काही सेलेब्रिटी आहेत ज्यांनी स्वतःला काही ठराविक जाहिरातींपासून दूर ठेवणे पसंत केले. कारण पैशांपेक्षा माणुसकीला प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका असते. सर्वसामान्यांवर वाईट परिणाम होईल अशी कोणतीही जाहिरात न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पाहूया ते सेलेब्रिटी आणि त्या ७ जाहिराती…

१) जॉन अब्राहम – जॉन अब्राहाम टीव्हीवरील पुरुष सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींमध्ये दिसून येतो. जॉनला अनेक वेळा दारू आणि तंबाखूसाठीही संपर्क साधण्यात आला. परंतु त्याने नेहमीच अशा जाहिराती करण्याला नकार दिला.

Loading...

२) अमिताभ बच्चन– अमिताभ बच्चनने कोल्ड ड्रिंकच्या जाहिरातींना त्यावेळी नकार दिला ज्यादिवशी त्यांना समजले की एका शाळकरी मुलीला अमिताभला अशा जाहिरातींमध्ये बघायचे नाही. मुलीचं असं म्हणणं होतं की, अमिताभ अशा जाहिराती करत आशेत जे आपल्या सगळ्यांसाठी विष आहे.

३) कंगना राणावत – बॉलिवूड क्वीन कंगना राणावतचे म्हणणे आहे की ती कधीही कोणत्याही फेयरनेस क्रीमची जाहिरात करणार नाही आणि आजपर्यंत तिने कधीही तशी जाहिरात केली नाही.

४) अक्षय कुमार – खिलाडी अक्षय कुमार त्याच्या निरोगी जीवनशैली आणि तंदुरुस्तीसाठी ओळखला जातो. अक्षयने कधीही पान मसाल्याची जाहिराती केल्या नाहीत.

५) आमिर खान – बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खानचे म्हणणे आहे की तो नेहमीच अशा जाहिराती करतो, ज्या सामाजिकदृष्ट्या उपयुक्त आहेत.

६) रणबीर कपूर – रणबीर कपूर देखील असे मानतो की तो अशा फेयरनेस ब्रँडला तो कधीही प्रोत्साहन देणार नाही, ज्यात रंगाबद्दल भेदभाव दर्शविला जात असेल.

७) सई पल्लवी – सई पल्लवीला फेअरनेस ब्रँडला प्रोत्साहन देण्यासाठी २ कोटींची ऑफर देण्यात आली होती, परंतु तिने हे करण्यास नकार दिला. तेव्हा पल्लवीच्या या निर्णयाचे कौतुक झाले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *