Breaking News
Loading...
Home / आरोग्य / उन्हाळी लागल्यावर कोणते घरघुती उपचार कराल ?

उन्हाळी लागल्यावर कोणते घरघुती उपचार कराल ?

उन्हाळ्याच्या काळात तापमान जास्त असते. वाढत्या तापमानामुळे उष्णतेचा त्रास जाणवायला लागतो. साहजिकच अनेकांना उन्हाळी लागण्याचे प्रकार घडतात. आता उन्हाळी लागणे म्हणजे नेमके काय ? तर उन्हाळी लागणे म्हणजे लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणे.

उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमुळे घामाच्या रूपात शरीरातील पाणी निघून जात असते, त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे साहजिकच क्षारांचे प्रमाण जास्त होते, त्यामुळेच लघवीत पाणी कमी असल्यामुळे मूत्रनलिकेच्या आतील आवरणास इजा होते. त्या आवरणाला इजा झाल्यामुळे लघवी करताना जळजळ किंवा वेदना जाणवतात. मुतखड्याचा त्रासदेखील उद्भवतो.

Loading...

पुरुष आणि स्त्रियांमध्ये उन्हाळीमुळे होणारा त्रास वेगवेगळा असतो. साधारणतः पुरुषांमध्ये लघवीच्या वेळी मूत्रनलिकेत जळजळ किंवा दाह होतो. तर स्त्रियांमध्ये लघवीच्या वेळी जळजळ होण्यासोबतच कळ मारणे, ठणकणे, कधीकधी लघवीतून रक्त जाणे असे त्रास दिसून येतात. उन्हाळीचा त्रास केवळ प्रौढांनाच होत नाही, तर लहान मुलांमध्येही उन्हाळी लागण्याचे प्रकार घडतात.

उन्हाळ्यात आपल्या शरीराची पचनशक्ती थोडीशी मंदावलेली असते, त्यामुळे भूक कमी लागते. अशावेळी खाण्यात काही गडबड झाल्यास पॉट बिघडते आणि त्याचा परिणाम उत्सर्जन संस्थेवर होतो. त्यामुळेही उन्हाळी लावू शकते.

उन्हाळी लागल्यानंतर कोणते घरघुती उपचार कराल ?

१) उन्हाळी लागल्यानंतर करायचा घरघुती आणि सर्वात रामबाण उपाय म्हणजे गूळ आणि पाणी पिणे. त्यासाठी गुळाचा खडा घेऊन तो चावून खावा आणि सोबतच पाणी पित राहावे. किती गूळ खावा याला काही बंधन नाही, कारण गूळ आरोग्यासाठी चांगला असतो.

२) सर्वसाधारणपणे शरीरात तयार होणाऱ्या मुत्रापेक्षा आपण पिलेल्या पाण्याचे प्रमाण जास्त असायला हवे. त्यासाठी भरपूर पाणी प्यावे. माठात वाळा घातलेले पाणी पिणे उन्हाळ्यात शरीराला आरोग्यदायी असते.

३) फळांमध्ये शहाळ्याचे पाणी, कलिंगडाचा रस किंवा ताडाच्या झाडापासून तयार झालेली नीरा पिणे देखील लाभदायक असते. एवढे करूनही उन्हाळीचा त्रास कमी होत नसेल तर डॉक्टरांना भेटणे उत्तम असते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *