Breaking News
Home / नवीन खासरे / महाराष्ट्रातील या जिल्ह्यात दोघे बहिण भाऊ सांभाळतात कायदा व सुव्यवस्था…

महाराष्ट्रातील या जिल्ह्यात दोघे बहिण भाऊ सांभाळतात कायदा व सुव्यवस्था…

सध्या घरात एक अधिकारी झाला कि जिद्दीने दुसरा अधिकारी होण्याचे प्रसंग फार कमी घडतात. असेच काही घडले आहे भाऊ आयएएस तर बहिण आयपीएस म्हणून सध्या महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात काम करत आहे.

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात हि गोष्ट घडली आहे. इथे कार्यरत असलेले जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची बहिण आंचल दलाल सातारा ग्रामीणच्या उपअधीक्षक पदी बदली झाली आहे. विशेष म्हणजे आंचल यांचे पती जितेंद्र देखील आयएएस अधिकारी आहे. सध्या ते देखील महाराष्ट्रात कार्यरत आहे नुकताच त्यांचा जयपूर येथे विवाह संपन्न झाला.

या दोघांचे लग्न अगदी सध्या पद्धतीने जयपूर येथील अक्षरधाम मंदिरात संपन्न झाले होते. जितेंद्र हे २०१६ तुकडीमधील आयएएस अधिकारी आहे आणि आंचल २०१७ तुकडी मधील आयपीएस अधिकारी आहे.

महाराष्ट्रातील नागरिक शांतताप्रिय आणि कायद्याचे पालन करणारे आहे त्यामुळे आंचल यांनी ड्युटीसाठी महाराष्ट्र निवडले असे ती सांगते. या अगोदर आंचल यांनी रेल्वे मध्ये अधिकारी म्हणून काम केलेले आहे. आंचल आणि जितेंद्र हे मूळ उत्तर प्रदेश मधील शमली या जिल्ह्यातील आहे. रेल्वेमध्ये असताना त्या नागपूर येथे कार्यरत होत्या.

नौकरी सोबत आंचल स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याचे काम देखील करतात. स्पर्धा परीक्षेसाठी त्यांना भावाने खूप मदत केली या बाबत त्या सांगतात कि, “आयपीएसच्या परिक्षेसाठी मला माझ्या भावाची खूप मदत झाली. सर्वात जास्त माहिती जनरल नॉलेजची माहिती त्यांच्याकडून मिळाली. तसेच मुलाखतीसाठी कोणता अभ्यास करायचा, कोणती माहिती असायला हवी हे त्यांनीच सांगितले होते. माझे सर्व शिक्षण ऍकॅडमीत झालेले आहे. तसेच कोलकत्ता येथील राष्ट्रीय विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतलेली आहे. त्यामुळे लोकांना न्याय देणे आणि गुन्हेगारांना रोखण्यासाठी माझ्या शिक्षणाचा उपयोग होईल, या उद्देशाने मी आयपीएस केडर निवडले. याक्षेत्रातच मी अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकते”

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हा info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *