Breaking News
Loading...
Home / बातम्या / ब्रेकिंग न्यूज; आमदार निलेश लंके ह्यांचा मंत्रिमंडळात होऊ शकतो समावेश; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराने केले सूचक वक्तव्य

ब्रेकिंग न्यूज; आमदार निलेश लंके ह्यांचा मंत्रिमंडळात होऊ शकतो समावेश; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराने केले सूचक वक्तव्य

महाराष्ट्र राज्यात कोरोना काळात काम केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके चांगलेच चर्चेत आले होते. त्यांनी कोरोना रुग्णांची चोवीस तास कोरोना सेंटरवर हजेरी लावून केलेली सेवा सगळीकडे चर्चिली गेली. त्यांच्या कामाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले.

आता निलेश लंके यांना प्रमोशन प्रमोशन मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी आमदाराने याबाबत विधान केले आहे. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी म्हटले आहे की, मी ४७ वर्षांपासून राजकारणात आहे. पण आतापर्यंत रुग्णांची अशी सेवा केलेला आमदार मी पहिला नाही.

Loading...

त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रमोशन मिळू शकणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. दौंड तालुक्यात आयोजित आरोग्य शिबिरात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार निलेश लंके हे पण उपस्थित होते. आमदार निलेश लंके यांनी बोलताना म्हटले आहे की, माजी आमदार रमेश थोरात हे माझे गुरु आहेत. त्यांच्यामुळे मी आमदार झालो. त्यांच्या आधारामुळे एक लाखाच्यावर मला मत मिळाले. माझ्या मतदार संघाची बांधणी मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

पुढील निवडणुकीच्या वेळी मी रमेश थोरात यांच्या प्रचाराला दौंड येथे येणार आहे. तुम्हाला सर्वाना अजितदादा पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना मतदान करण्याची संधी मिळते ही खूप मोठी संधी असल्याचे निलेश लंके यांनी यावेळी म्हटले आहे. कोरोनावरील भीती घालवणे हाच त्यावरील उपाय असल्याचे म्हटले आहे.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *