आरोग्यबातम्या

आईच्या दुधाविषयी सांगितली जाणारी ‘हि बाब’ पूर्णपणे खोटी आहे, प्रेग्नन्ट महिलांनी द्यावं ध्यान..

जगभरात ऑगस्ट महिना हा एका विशेष कारणासाठी ओळखला जातो. ते कारण म्हणजे लोकांना नवजात मातांना स्तनपानाविषयी जागरूक करणे. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात म्हणजेच १ ते ७ ऑगस्ट या तारखेदरम्यान दरवर्षी स्तनपानाविषयी जागरूक केले जाते. या आठवड्याला ब्रेस्ट फीडिंग वीक असे देखील संबोधले जाते.

स्तनपानाविषयी महिलांमध्ये अनेक गैरसमज असतात. आईच्या दुधाशी संबंधित दंतकथा दूर करणे आणि प्रत्येक लहान शिशुला आईचेच दूध मिळावे यासाठी योग्य ती जागृती करणे हे मुख्य कारण स्तन पानाविषयी आहे.

बाळाच्या जन्मानंतर पहिला तास हा अत्यंत महत्वाचा असतो. या तासात डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बाळाला आईचे दूध मिळणे अत्यंत आवश्यक असते. मात्र भारतातील अनेक भागात शिक्षणाचा अभाव तसेच अपुऱ्या माहितीमुळे आईचे सुरुवातीचे दूध हे जाड असते. हे दूध बाळाला पचण्यासाठी जड असते असे म्हटले जाते.

मात्र खरे पाहिले तर राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालानुसार २०१५-१६ मध्ये बिहारमधील केवळ ३४.९ टक्के मुलांना जन्माच्या एका तासाच्या आत आईचे दूध मिळते. तर २०१९-२० मध्ये हा आकडा ३१.६ टक्क्यांवर आला आहे आणि हे अत्यंत चिंताजनक आहे.

मुलाच्या जन्मानंतर पहिल्या तासातच आईचे दूध देणे का गरजेचे आहे? या प्रश्नावर तज्ञ् डॉक्टर रवी सिंह यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. डॉक्टर रवी सिंह हे रिवा येथे सराव करतात. डॉक्टर रवी सिंह यांनी सांगितले आहे की, बाळ हे पहिल्या तासातच ऍक्टिव्ह होते. त्याला पहिल्या तासात दूध नाही दिले तर ते सुस्त होते. त्यामुळे तात्काळ दूध पाजायला हवं. शिवाय दुधामध्ये कोलोस्ट्रम असते. ज्यामुळे बाळाला पहिल्यांदा शी करण्यास मदत होते. बाळाच्या जन्मानंतर आईचे दूध पहिल्या तासांत दिल्यास गर्भाशय आणि अंडाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी असते.

जेवढं गरजेचं जन्मानंतर ६ महिने आईचे दूध देणे आहे तेवढंच गरजेचं बाळाला पहिल्या तासात आईचे दूध देणे आहे. याव्यतिरिक्त आईने देखील दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या आहाराचा जेवणात समावेश करणे गरजेचे आहे. यासह प्रसूती देखील घरच्या घरी न करता आरोग्य केंद्रामध्ये अथवा नर्सिंग होममध्ये करावी जेणेकरून प्रसूतीवेळी व नंतरही पुरेशी काळजी घेण्यात येईल. तसेच ग्रामीण भागात देखील जास्तीत जास्त जागृती करणे गरचेचे आहे असे रवी सिंह यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button