Breaking News
Loading...
Home / बातम्या / बॉलिवूडचे हे ६ स्टार सुट्ट्यांच्या दिवसात कुठे जातात माहिती आहे का?

बॉलिवूडचे हे ६ स्टार सुट्ट्यांच्या दिवसात कुठे जातात माहिती आहे का?

बॉलिवूड फॅन्सना आपल्या आवडत्या कलाकारांच्या प्रत्येक गोष्टीची नक्कल करण्याची आवड असते. कोणी त्यांच्यासारखी फॅशन करते, कोणी त्यांच्यासारखे राहणीमान, तर कोणी त्यांच्या वागण्याबोलण्याची नक्कल करतात. आता आपल्या आवडत्या कलाकारांना एवढेच फॉलो करताय तर ते कलाकार सुट्ट्यांच्या काळात कुठे जातात, कुठल्या ठिकाणी जाऊन फोटो काढत आहेत हे जाणून घ्यायला आणि तिथे जायलाही तुम्हाला नक्की आवडेल. पाहूया मग त्याविषयीचं…

१) सैफ अली खान – करीना कपूर : सैफ आणि करीना दरवर्षी सुट्ट्यांच्या काळात स्वित्झर्लंड मधील गस्ताद येथे जाणे पसंत करतात. नवाब फॅमिलीच्या आवडत्या ठिकाणांपैकी गस्ताद हे एक ठिकाण आहे.

Loading...

२) शाहरुख खान – गौरी खान : किंग खानला दुबई हा देश इतका आवडतो की त्याने तिथे जागाही विकत घेतली आहे. शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी सुट्ट्यांमध्ये दुबईला हमखास जातात.

३) करिष्मा कपूर : कपूर फॅमिलीमधील निळ्या डोळ्यांची बाहुली बेबो म्हणजेच करिष्मा कपूर हिला लंडनचे वातावरण फार आवडते. त्यामुळे तिच्या सुट्ट्यांच्या काळात निवांत असली की लंडनला जाऊन सुट्ट्यांचा आनंद घ्यायला तिला आवडते.

४) प्रियांका चोप्रा : बॉलिवूड ते हॉलिवूड स्टार असा प्रवास करणारी देसी गर्ल प्रियांका चोप्राला समुद्र किनारे आवडतात. त्यामुळे सुट्ट्यांमध्ये प्रियांका तिच्या पतीसोबत म्हणजेच निक जोन्स सोबत मियामीला जात असते.

५) अनुष्का शर्मा – विराट कोहली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा या दाम्पत्याला निसर्गाच्या सानिध्यात राहत्या आवडते. त्यामुळे हिमालयाच्या डोंगराळ भागात आपला क्वालिटी टाईम घालवणे त्यांना आवडते.

६) मलाईका अरोरा : आयटम गर्ल मलाईका अरोरा हिला मालदीव बेटांवरील निसर्गरम्य वातावरण आवडते, त्यामुळे सुट्ट्यांच्या काळात मलाईका सहसा मालदीव बेटांवरच जात असते. आता तुम्ही सांगा तुम्हाला यापैकी कोणत्या ठिकाणी जायला आवडेल ?

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *