Breaking News
Loading...
Home / बातम्या / २ कोटींच्या BMW कारचा मालक पेट्रोल टाकण्यासाठी करायचा असे काही, वाचून हसू आवरणार नाही!

२ कोटींच्या BMW कारचा मालक पेट्रोल टाकण्यासाठी करायचा असे काही, वाचून हसू आवरणार नाही!

हौस भागवायची म्हणल्यावर माणूस कुठल्याही ठरला जाऊ शकतो. याचेच एक उदाहरण म्हणजे चीन मधील एक व्यक्तीकडे पाहून सांगता येईल. सध्या ही व्यक्ती सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनली आहे.

चीनच्या सिचुआन प्रांतातील एका श्रीमंत शेतकऱ्याने हौसेखातर २ कोटी रुपयांची महागडी BMW कार खरेदी केली. काही दिवस त्याने नव्या गाडीचा भरपूर आनंद घेतला. पण कारमध्ये पेट्रोल भरून भरून त्याची परिस्थिती पार खराब होऊन गेली.

Loading...

हौस भागवण्यासाठी बनला कोंबड्या चोर

आपला BMW कारमध्ये फिरण्याचा शौक पूर्ण करण्यासाठी आणि BMW चे स्टेटस मेंटेन करण्यासाठी त्या व्यक्तीला पैशांची गरज होती. मग महाशयनीं लोकांच्या घरातून कोंबड्या आणि बदके चोरायला सुरुवात केली.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्यांनुसार ही व्यक्ती लोकांच्या घरातून कोंबड्या आणि बदक चोरून ती बाजारात विकायचा आणि त्यातून येणाऱ्या पैशांतून BMW कारमध्ये पेट्रोल टाकण्याचे काम करायचा. पण कोंबड्या चोरून चोरून त्यातून तरी किती पैसे मिळणार ?

…आणि चोर सापडला

आपल्या घरातील कोंबड्या चोरीला जात असल्याचे लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांचा तपास सुरु झाला. चौकशी करत असताना त्यांना समजले की एक व्यक्ती कोंबड्या चोरी करत आहे.

पोलिसांनी खाक्या दाखवताच त्या व्यक्तीने आपला गुन्हा कबुल केला. पोलिसांना त्याने सांगितले की या चोऱ्या त्याने आपल्या तहानलेल्या BMW कारला पेट्रोल पाजण्यासाठी केल्या होत्या. शौक माणसाला काय काय करायला लावेल याचा काही नियम नाही.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *