Breaking News
Loading...
Home / राजकिय / ‘हे’ होणार भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, अमित शहांच्या जागी होणार निवड

‘हे’ होणार भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, अमित शहांच्या जागी होणार निवड

२०१४ ला मोदीलाटेत भाजपने केंद्रात सत्ता काबीज केली. त्यावेळी अमित शहा यांनी उत्तर प्रदेशात केलेल्या कामगिरीमुळे त्यांचाकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद आले. त्यांच्या नेतृत्वात देशभरात भाजपचा यशाचा आलेख वाढत गेला. अनेक राज्यात भाजपने सत्ता काबीज केली. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा मोठं बहुमत घेत केंद्रात बहुमत मिळवलं.

मोदी २ मंत्रिमंडळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना मोठी जबाबदारी मिळाली. त्यांना गृहमंत्रीपद मिळाले. अमित शहा यांचा कार्यकाळ जानेवारी २०१९ मध्ये पूर्ण झाला होता. लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन अध्यक्षपदासाठीची निवडणूक टाळली गेली. शहा केंद्रीय गृहमंत्री बनल्यामुळे नड्डा यांना जून महिन्यात कार्यकारी अध्यक्ष बनवले गेले.

Loading...

अखेर आता भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २० जानेवारी रोजी सकाळी १० ते १२.३० ही अर्ज भरण्याची वेळ आहे. माजी केंद्रीय मंत्री व निवडणूक अधिकारी राधा मोहन सिंह यांनी गरज भासली तर २१ जानेवारी रोजी सकाळी १० ते दोन वाजेपर्यंत मतदान घेतले जाईल.

जे. पी. नड्डा होणार नवे अध्यक्ष-

दरम्यान भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. जे. पी. नड्डा २० जानेवारी रोजी पक्षाचे अध्यक्ष बनणार आहेत. त्यांच्याविरोधात कोणी उमेदवारी अर्ज भरला नसल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध होणार हे निश्चित आहे.

जेपी नड्डा हे मोदी सरकार-१ मध्ये आरोग्य मंत्री होते. विद्यार्थी जीवनापासून ते राजकारणात सक्रिय होते. नड्डा हे हिमाचल प्रदेशातून आहेत. १९९३ मध्ये ते पहिल्यांदा हिमाचल प्रदेश विधानसभेचे सदस्य बनले. त्यांनी राज्यात आणि केंद्रात मंत्रिपदही भूषवले आहे. जेपी नड्डा हे सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. ते पक्षाच्या सर्वोच्च संसदीय बोर्डचे सचिवही आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *