Breaking News
Loading...
Home / बातम्या / नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणाऱ्या गोयलची महाराष्ट्रविरोधी भूमिका

नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणाऱ्या गोयलची महाराष्ट्रविरोधी भूमिका

१२ जानेवारी २०२० रोजी भाजप नेता जय भगवान गोयल याने लिहलेल्या “आज के शिवाजी नरेंद्र मोदी” या पुस्तकाचे प्रकाशन भाजपच्या नवी दिल्ली कार्यालयात झाले. या प्रकाशनासाठी भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी शाम जाजु आणि माजी खासदार महेश गिरी उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनाच्या बातम्या आल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही, अशी भूमिका शिवप्रेमींनी घेतली आहे.

महाराष्ट्रातील वातावरण तापले असून पुस्तकावर बंदीची मागणी केली जात आहे. दरम्यान या सगळ्या वादाचे मूळ असणाऱ्या जय भगवान गोयलने ताठर भूमिका घेतली असून पुस्तक मागे घेण्याचा विषयच नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. हा गोयल नेमका आहे तरी कोण ?

Loading...

जय भगवान गोयल हा भारतीय जनता पक्षाचा नेता आहे. यापूर्वी १९८२ ते १९८७ मध्ये तो शिवसेनेचा पंजाबमधील अध्यक्ष होता. १९८८ ते १९९० तो शिवसेना दिल्ली अध्यक्ष बनला. १९९० ते २००८ पर्यंत तो शिवसेनेचा उत्तर भारत राष्ट्रीय अध्यक्ष होता. २००८ मध्ये उत्तर भारतीयांना महाराष्ट्रात सापत्न वागणूक मिळत असल्याचे कारण देत त्याने शिवसेना सोडली आणि स्वतःचा “राष्ट्रवादी शिवसेना” पक्ष स्थापन केला. त्यानंतर २०१४ मध्ये त्याने भाजपमध्ये प्रवेश केला.

जय भगवान गोयलची महाराष्ट्रविरोधी भूमिका

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी जय भगवान गोयलची पोलखोल कर्तबान सांगितले आहे की, “१५ वर्षांपूर्वी गोयलने महाराष्ट्राच्या विरोधात गर्ल ओकून दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला केला होता. त्यावेळीत्याला आव्हान देऊन त्याच्या घरातून त्याला मी पळवून लावले होते.” एवढेच नाही तर गोयलने मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करुन “मी जितका छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करतो, तेवढा सन्मान मराठी लोकही करत नसतील” असे मराठी लोकांना हिणवणारे वक्तव्य केले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *