Breaking News
Loading...
Home / बातम्या / भारतातील हे रेल्वे स्टेशन ४२ वर्षे एका मुलीमुळे होते बंद, कारण माहीत आहे का ?

भारतातील हे रेल्वे स्टेशन ४२ वर्षे एका मुलीमुळे होते बंद, कारण माहीत आहे का ?

एका मुलीमुळे ४२ वर्षे रेल्वे स्टेशन बंद होते हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, कदाचित आपल्याला हा विनोदही वाटेल, परंतु हे अगदी खरे आहे. पश्चिम बंगाल राज्यातील पुरुलिया जिल्ह्यात असणारे “बेगुनकोदर रेल्वे स्थानक” याचा पुरावा आहे. हे रेल्वे स्टेशन १९६० साली सुरू करण्यात आले होते.

असे सांगितले जाते की, हे स्टेशन सुरु करण्यात संथालची राणी श्रीमती लाचन कुमारी यांनी मोलाची भूमिका बजावली होती. परंतु स्टेशन सुरु झाल्याच्या ७ वर्षांच्या काळातच भुताटकीच्या अफवांमुळे हे स्टेशन बंद झाले.

Loading...

काय आहे त्या मुलीची भूतकथा ?

१९६७ साली बेगुनकोदर रेल्वे स्थानकाच्या एका कर्मचाऱ्याने रात्री स्टेशनवर एका महिलेचे भूत बघितल्याचा दावा केला होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याने या संदर्भात लोकांना सांगितले, तेव्हा सर्वांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. परंतु त्यानंतर काही दिवसांनी स्टेशन मास्टर आणि त्याचे संपूर्ण कुटुंब जेव्हा रेल्वे क्वार्टरमध्ये मृत असअवस्थेत आढळले, तेव्हा बेगुनकोदर स्थानकातील कर्मचाऱ्यांची बोबडीच वळली. त्यादरम्यान अशी अफवासुद्धा उडाली की या स्टेशनवर एका मुलीचा मृत्यू झाला होता आणि तिचे भूत या स्थानकावर फिरत असते.

स्थानकाच्या जवळपास राहणाऱ्या रहिवाशांनी असा दावा केला की स्टेशन मास्टर आणि कुटुंबियांच्या मृत्यूमध्ये याच मुलीच्या भूताचा सहभाग होता. सूर्य मावळल्यानंतर एखादी ट्रेन इथून जात असताना, त्या मुलीचे भूत ट्रेनसोबतच पळायचे. कधीकधी तर ते ट्रेनपेक्षा वेगाने पळत जाऊन ट्रेनला मागे टाकायचे. त्यासोबतच ट्रेनच्या समोर रुळांवरही ते भूत नाचताना बघितल्याचा दावा करण्यात आला होता.

या भीषण घटनांनंतर बेगुनकोदर रेल्वे स्टेशन “भूतिया रेल्वे स्टेशन” म्हणून ओळखले जाऊ लागले. इथल्या रहिवाशांमध्ये या मुलीच्या भूताची भीती इतकी वाढली होती की या स्टेशनवर यायलाही लोक घाबरायला लागले. हळूहळू या स्टेशनवर लोक आई काम करणारे कर्मचारीही यायचे बंद झाले. हळूहळू स्टेशनच बंद झाले, परंतु २००९ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी हे स्टेशन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *