आयपीएल २०२२ मध्ये नवीन असणाऱ्या गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स या संघानी पहिल्यांदा खेळात असताना पण अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवला आहे. या संघांमध्ये योग्य ताळमेळ असून सुरुवातीपासूनच त्यांनी जिंकण्याच्या इराद्याने सुरुवात केली होती. लवकरच आयपीएल मधली अंतिम सामना खेळला जाणार आहे.
यावेळी गुजरात टायटन्स संघावर आरोप करण्यात आले आहेत. सीव्हीसी लिमिटेड या कंपनीने गुजरात टायटन्स संघाची खरेदी केली होती. मूळ गुजरातच्या असणारा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला संघाने कर्णधार नियुक्त केले होते. या सीव्हीसी कंपनीच्या अनेक जुगार म्हणजेच बेटिंग करणाऱ्या अँपमध्ये गुंतवणूक आहे.
त्यामुळे या कंपनीला संघ खरेदी करण्याचे हक्क कस काय देण्यात आले यावर आरोप करण्यात आले होते. या कंपन्यांची युरोप मधील खेळांच्या लीग मध्ये पण गुंतवणूक आहे. पण तिथे बेटिंग करणे कायद्याने मान्य करण्यात आले आहे. पण भारतात त्याला मान्यता नाही. तरीही बीसीसीआयने या खेळाला कोणत्या नियमातून मान्यता दिली हे अजूनही उमगलेले नाही.