प्रत्येक भारतीयाशी जोडलेली अशी कोणती गोष्ट आहे का जी मोठ्या प्रमाणावर वाढत असून प्रत्येक जण त्यामुळे चिंतेत आहे? लावला ना डोक्याला हात. अशी एकच गोष्ट आहे जी आहे महागाई. दिवसेंदिवस महागाई वाढत असून तिच्यावरून जास्त चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दररोज प्रत्येक भारतीय माणसाला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने हे जाहीर केले आहे की एप्रिल महिन्यात महागाई १५.०८ टक्के वाढली आहे. याचा सोपा अर्थ म्हणजे आधी जेव्हा आपण एखादी वस्तू १०० रुपयांना घेत होतो तीच वस्तू काही दिवसांनी ११५.०८ रुपयांना विकत मिळणार आहे. महागाई वाढली की सरळ सरळ रशिया आणि युक्रेन मधील युद्ध कारणीभूत असल्याचे सांगितले आहे.
जेव्हा महागाई वाढत होती तेव्हा साहजिकच तिच्या वाढीच प्रमाण पण जास्तच होते. जानेवारी पासून एप्रिल पर्यंत ते ३ टक्के म्हणजेच १०० रुपयांमागे तब्बल ३ रुपयांनी वाढले आहे. जानेवारी २०२२ मध्ये १२.९६%, फेब्रुवारी २०२२ मध्ये १३.४३%, मार्च २०२२ मध्ये १४,५५% आणि मे महिन्यात ते १५.०८ टक्यांपर्यंत वाढले आहे.
जेव्हा महागाई वाढते तेव्हा साहजिकच तेथे असणाऱ्या वस्तूंच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढत असतात. त्या वाढतात साहजिकच डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. मे महिन्यात तब्बल ६० पैसे झाले आहे. त्यामुळे साहजिकच वस्तूंच्या किंमती वाढतात. परिस्थिती जर अजून ढासळली तर वस्तूंच्या किंमती अजून वाढतील असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.