Breaking News
Loading...
Home / बातम्या / वास्तुविशारद अन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का ?

वास्तुविशारद अन्वय नाईक कुटुंबाविषयी आपणास हि माहिती आहे का ?

आर्किटेक अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या प्रकरणात २ वर्षानंतर आज अर्णब गोस्वामीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या नंतर मीडियात विविध गोष्टी दाखवण्यात येत आहे परंतु अन्वय नाईक कोण होते ? त्यांचा व्यवसाय कसा चालायचा, त्यांचे कुटुंब याबाबत कोणालाही माहिती नाही.

अन्वय नाईक हे कॉनकॉर्ड डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक होते. लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने ३ लोकांचे नाव लिहले होते.अर्णब गोस्वामी, फिरोझ शेख आणि नितीश सारडा हे आहे आणि या तिघांनी अन्वयचे ५.४ करोड रुपये बुडविल्या बाबत अन्वयने चिठ्ठी लिहून ठेवली होती.

Loading...

अन्वय यांच्या कॉनकॉर्ड कंपनीने रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी,स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी डिझाईनिंगचे काम केले होते. हे काम पूर्ण झाल्यानतंरही नाईक यांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नव्हते. दरम्यान, ४ मे २०१८ रोजी अन्वय कावीर अलिबाग येथील आपल्या घरी आले होते.

अन्वय नाईक यांचा हा शेवटचा प्रोजेक्ट होता असे त्यांच्या कुटुंबाचे म्हणणे आहे. अन्वय यांची पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक यांना तक्रार केल्यानंतर विविध लोकाकडून त्रास देण्यात आला. अन्वयच्या कंपनीने आत्तापर्यत ३०० कोटीची उलाढाल केली होती. अन्वय यांची मुलगी आज्ञा हि टेनिस मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत होती. विम्बलडन ज्युनिअर मध्ये देखील तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

अन्वय यांच्या पत्नीने मिडीयासोबत बोलताना सांगितले कि त्या दोघांचा प्रेमविवाह होता. नवव्या वर्गात असताना दोघाचे प्रेम झाले आणि नंतर त्यांनी विवाह केला. अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा हिनं मे महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन तक्रार तिनं केली होती. त्यानंतर या प्रकरणाची नव्यानं चौकशी करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले होते.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.

Loading...
Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *