जेव्हा गरीब घरातील एखादी व्यक्ती अभ्यास आणि मेहनत घेऊन जेव्हा अधिकारी होते तेव्हा त्याचा आनंदच निराळा असतो. त्यांनी तिथपर्यंत जाण्यासाठी कष्ट आणि परिश्रम घेतलेले असतात. त्यामुळे त्याचा आनंद साहजिकच असतो. भाजी विकणारी अंकिता नागर ही मुलगी न्यायाधीश झाली आहे. ही गोष्ट भाजी विकणारी अंकिता नागरची आहे.
जेव्हा निकाल लागायला अवधी होता तेव्हा अंकिता तिच्या आई वडिलांना मदत करायला जात असायची. तिच्या घरच्यांना जेव्हा निकाल समजला की तुमची मुलगी अधिकारी झाली आहे तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. जेव्हा घरच्यांना काम करताना तिने पहिले होते तेव्हापासून ती त्यांना हातभार लागावा म्हणून मदत करायला जात असायची.
जेव्हा अंकिताची एका मुलाने छेड काढली होती तेव्हा तिने कोर्टाची पायरी चढली होती. या ठिकाणी गेल्यानंतर जेव्हा तिला न्यायाधीश या पदाबद्दल समजले तेव्हा तिने बनायचे तर हेच हाच निश्चय केला होता. जेव्हा तिने यासंबंधातील अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा अनेक नवीन नवीन गोष्टी तिला माहित झाल्या. समाजातील अनेक वर्गातील लोकांनी तिला मदत केली.
२९ व्या वर्षी अंकिता न्यायधीश होण्यात यशस्वी झाली आहे. तिने जवळपास या आधी ३ प्रयत्न केले होते पण तेव्हा तिला यश आले नव्हते. तिच्या आई वडिलांना विचारले असता मुलीने अभ्यास केला म्हणून ती अधिकारी झाल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. तिच्या या यशामुळे सर्वसामान्य घरातील मुले पण यशस्वी होऊ शकतात हा विश्वास निर्माण झाला आहे.