Breaking News
Loading...
Home / बातम्या / कर्जात बुडालेले अनिल अंबानी राहतात ५ हजार कोटींच्या घरात, लाईट बिल ऐकून थक्क व्हाल..

कर्जात बुडालेले अनिल अंबानी राहतात ५ हजार कोटींच्या घरात, लाईट बिल ऐकून थक्क व्हाल..

अनिल अंबानी सध्या कर्जत बुडालेले आहेत. त्यांच्यावर सध्या लंडनच्या कोर्टात केस देखील चालू आहे. अनिल अंबानी यांनी अनेक चिनी बँकांकडून कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाची परतफेड ते करू शकले नाहीत. एका रिपोर्टच्या मते अनिल अंबानी यांच्यावर एक्सपोर्ट एंड इम्पोर्ट बैंक ऑफ चायना आणि डेवलपमेंट बैंक ऑफ चायनाचे जवळपास ५२७६ करोड रुपये कर्ज आहे. याच कर्जामुळे बँकांनी त्यांच्यावर केस दाखल केली आहे.

लंडनच्या न्यायालयानं त्यांना जूनपर्यंत कर्ज भरण्यास सांगितले होते. पण ते यामध्ये आता अपयशी ठरले. त्यांनी कोर्टास सांगितले होते कि ते कर्ज भरू शकत नाहीत. त्यांच्याकडे आता काहीच शिल्लक राहिले नसून ते दागिने विकून वकिलांची फीस देत आहेत. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल कि अनिल अंबानी हे तब्बल ५ हजार कोटींच्या घरात राहतात.

Loading...

त्यांच्यावर जेवढं कर्ज आहे त्याच्यापेक्षा जास्त किमतीचं त्यांचं घर आहे. अनिल अंबानींचं हे घर मुंबईत असून या घरात फक्त ४ च लोकं राहतात. यामध्ये अनिल अंबानी, पत्नी टिना मुनीम, आणि त्यांचे २ मुलं अंशुल आणि आणि अनमोल राहतात.

धीरूभाई अंबानी ग्रुपच्या चेअरमन असलेल्या अनिल अंबानी यांनी खूप सुंदर हे घर बनवलेले आहे. २०१८ मध्ये फायनॅन्शिअल सर्व्हिस कंपनी IIFL ने या घराचा समावेश महागड्या घराच्या यादीत दुसऱ्या स्थानावर केला होता. या लिस्टमध्ये मुकेश अंबानी यांचं घर एक नंबरला होतं. अनिल अंबानी यांच्या घरात जे डेकोरेशनचं सामान लावलेलं आहे त्याची किंमत करोडो मध्ये आहे.

त्यांनी विदेशातील प्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर कडून आपलं घर सजवलं आहे. त्यांनी हे घर मुंबईच्या पाली हिल परिसरात बांधलं आहे. त्यांच्या या घराचा १६०० फूट असून यामध्ये जीम स्विमिंग पूल आणि इतर अनेक सुविधा आहेत.

Loading...

अनिल अंबानी यांच्या या घरावर हेलिपॅड देखील बनवण्यात आलेला आहे. त्यांना हे घर खूप उंच करायचं होतं पण त्यांना यासाठी परवानग्या मिळाल्या नव्हत्या. अनिल अंबानी यांच्या या घराच्या सांभाळण्याचा खर्च देखील खूप मोठा आहे. या घरात मोठा स्टाफ असून त्यांना प्रत्येक महिन्याला लाखो रुपये सॅलरी दिली जाते.

बोललं जाते कि अनिल अंबानी यांच्या या घराचं लाईट बिल हे तब्बल ६० लाख रुपये आहे. जेव्हा त्यांच्या घराविषयी कोर्टात विचारलं गेलं तेव्हा त्यांनी घराचा खर्च पत्नी करत असल्याचं म्हंटलं होतं.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *