Breaking News
Loading...
Home / आरोग्य / ‘या’ औषधानं कोरोना रुग्णांच्या प्रकृतीत पडतोय खूप चांगला फरक, ठरू शकते रामबाण

‘या’ औषधानं कोरोना रुग्णांच्या प्रकृतीत पडतोय खूप चांगला फरक, ठरू शकते रामबाण

जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना व्हायरसवरील उपचारासाठी औषध आणि लस शोधत आहेत. या सगळ्यात एका औषधाची जगभरात जोरदार चर्चा सुरू होती. या औषधाचे नाव आहे ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’. हे औषध पहिल्यांदा तेव्हा चर्चेत आले, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध देण्याची विनंती केली.

मलेरिया आजाराच्या उपचारामध्ये वापर होणाऱ्या औषधापासून अनेक देशांना कोरोनावरील औषध तयार होण्याची आशा आहे. भारताने अमेरिका, ब्राझील, इस्राइलसह अनेक देशांना है औषध दिले आहे. एका लॅब स्टडीनुसार क्लोरोक्वीन कोरोना व्हायरसला शरीरातील सेल्समध्ये जाण्यापासून रोखतो. परंतू, हायड्रोक्सीक्लोरोक्वीनवर केलेल्या अनेक अभ्यासातून हेदेखील समोर आले आहे की, है औषध इंफ्लुएंजा आणि दुसऱ्या व्हायरल आजारांना ठीक करण्यास सक्षम नाही.

Loading...

हायड्रोक्सीक्लोरोक्वीन अमेरिकेत एवढे प्रभावी ठरत नसल्याचे देखील समोर आले आहे. अमेरिकेत वेगवेगळ्या औषधांवर सध्या संशोधन सुरु आहे. त्यामध्ये एक औषध समोर आले आहे जे कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी रामबाण ठरत असल्याचे समोर आले आहे.

कोरोना साथीची लागण झालेल्या रुग्णांवरील उपचारांत रेमडेसिव्हिर हे विषाणू प्रतिबंधक औषध अत्यंत उपयोगी ठरत असल्याचे प्रयोगातून समोर आले आहे. संसर्गजन्य रोग या विषयातील अमेरिकी तज्ज्ञ अँथनी फौसी यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन प्रकृती गंभीर बनलेल्या रुग्णांपैकी काही जणांना रेमडेसिव्हिर हे औषध पाच दिवस, तर काही जणांना दहा दिवस देण्यात आले.

या रुग्णांच्या प्रकृतीत खूप चांगला फरक पडल्याचे दिसून आले. रुग्ण बरे होण्यात रेमडेसिव्हिर हे औषधही गुणकारी ठरले. पाच दिवस रेमडेसिव्हिर औषध घेणाऱ्या कोरोना रुग्णांच्या प्रकृतीत जितकी सुधारणा झाली होती, तेवढेच प्रमाण हे औषध १० दिवस घेणाºया रुग्णांमध्येही आढळून आले होते.

अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया येथील गिलिड सायन्सेस ही कंपनी कोरोना रुग्णांवर रेमडेसिव्हिर औषधाच्या चाचण्या करत आहे. रेमडेसिव्हिर हे औषध घेतल्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीत किती सुधारणा झाली त्याचे निरीक्षण करण्यात आले. त्यावरून हे औषध कोरोनावर किती गुणकारी आहे हे ठरविण्यात येत आहे.

हे औषध देण्यात आलेले निम्मे रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देखील मिळाला आहे. अजून या औषधावर प्रयोग सुरुच असून जर हे औषध असेच प्रभावी ठरले तर जगाला एक आशेचा किरण मिळू शकतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *