Breaking News
Loading...
Home / बातम्या / अमेरिका राष्ट्रपती निवडणुकीत हे आहे ५ महत्वाचे मुद्दे..

अमेरिका राष्ट्रपती निवडणुकीत हे आहे ५ महत्वाचे मुद्दे..

प्रत्येक निवडणुकीत काहीना काही महत्वाचा मुद्दा असतो. भारतात प्रत्येक निवडणुकीत गरिबी, बेरोजगारी, शेतकरी हे विषय पुढे ठेवले जातात. मागील निवडणुकीत काळा पैसा हा देखील एक महत्वाचा मुद्दा होता. या वर्षी अमेरिकेत नवीन राष्ट्रपती निवडीसाठी निवडणूक सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बीडन चांगलेच एकमेकांना भिडले आहे तर या निवडणुकीत मुद्दे काय आहे ?

डोनाल्ड ट्रम्प हे डेमोक्रेटीक व जो बीडन हे रिपब्लिकन या पक्षाकडून निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीत सर्वात महत्वाचा मुद्दा आहे १. कोरोना वायरस:- अमेरिकेत ८० लाखाहून अधिक लोकांना कोरोन संक्रमण झाले आहे व २,२०,०० हून अधिक लोकांनी कोरोना मुळे जीव गमविला आहे. ट्रम्प याच्या ढिसाळ कारभारामुळे हा आकडा वाढला या करिता विरोधक जोरदार ट्रम्प वर टीका करत आहे. अमेरिकेत लॉकडाऊन कडक ठेवण्यात आले नाही त्यामुळे हे झाले असे रिपब्लिकनचे म्हणणे आहे.

Loading...

२. हेल्थ केयर:- अमेरिकेत आरोग्याकडे मोठ्या प्रमाणात लक्ष देण्यात येते. अमेरिकन सुप्रीम कोर्ट मध्ये एफोर्डेबल केयर एक्टला रद्द करण्याबाबत सुनावणी होणार आहे. हि योजना रद्द करण्यासाठी ट्रम्प यांनी अनेक प्रयत्न केले आहे. आता मतदानानंतरच लोकांना हि योजना हवी का नको.

३. अर्थव्यवस्था:- ट्रम्प राष्ट्रपती असताना ३ वर्ष अर्थव्यवस्था चांगली वाढली परंतु मार्च लॉकडाऊन पासून अर्थव्यवस्था खाली आली आहे. २.३ करोड छोट्या दुकानदारांना याचा फटका बसला आहे. बरोजगारी ३.७ वरून १४.७ टक्क्यावर आली आहे. जो बिडन या संधीचा उपयोग करून मध्यमवर्गाची परिस्थिती सुधरवण्यासाठी वेगवेगळे आश्वासन देत आहे.

४. वर्णभेद:- मे मध्ये मिनियापोलीस येथे जॉर्ज फ्लोयड यांची पोलिसाने केलेल्या अमानुष हत्ये नंतर अमेरिकेत मोठ्या प्रमाणात हाहाकार उडाला आणि त्यानंतर black live matters हे चळवळ मोठ्या प्रमाणात सुरु झाली. अनेक ठिकाणी यासाठी हिंसक आंदोलन झाले. संपूर्ण जगात या विरोधात प्रदर्शन झाले होते आणि अमेरिकेतील वर्णद्वेष यावर सर्वांनी निषेध नोंदविला होता.

५. गर्भपात:- श्वेत प्रोतेस्टट क्रिश्चन लोकांचे या निवडणुकीत सर्वात जास्त १५% मतदान आहे आणि हे लोक मोठ्या प्रमाणात मतदान देखील करतात. २०१६ला मोठ्या प्रमाणत ट्रम्पला या लोकांनी मतदान केले होते. ट्रम्प गर्भपाताच्या विरोधात आहे आणि दुसरीकडे लिबरल मतदान करणाऱ्या लोकांना हा मुद्दा महत्वाचा आहे. डेमोक्रोटिक लोकांना गर्भपाताचा अधिकार लोकांच्या हातात राहणे या समर्थनात आहे.

Loading...

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *