Breaking News
Loading...
Home / बातम्या / विराट कोहली विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल, केला आहे ‘हा’ मोठा आरोप

विराट कोहली विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल, केला आहे ‘हा’ मोठा आरोप

भारतीय क्रिकेट विश्वात हार्दिक पांड्याला मुलगा झाल्याच्या बातमीने क्रिकेटप्रेमींना आनंदाचा धक्का दिला होता. ही घटना ताजी असतानाच आज भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या बाबतीतल्या एका बातमीने क्रिकेटप्रेमींच्या आनंदावर विरजण घालण्याचे काम केले आहे. कॅप्टन कोहली विरुद्ध उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे. त्यामध्ये विराटवर मोठा आरोप करण्यात आला असून त्याच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे. पाहूया काय आहे हे प्रकरण…

विराट कोहलीवर कोणते आरोप करण्यात आले आहेत ?

Loading...

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत विराट आणि तमन्ना यांनी ऑनलाइन गँ बलिंग म्हणजेच ऑनलाईन जुगाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

चेन्नई मधील एका वकिलाने ही याचिका दाखल केली आहे. जुगार खेळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पैशांची परतफेड करु न शकलेल्या एका युवकाने आ त्म ह त्या केल्याच्या कारणाने ही याचिका दाखल करण्यात आल्याचे समजत आहे.

याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत मद्रास उच्च न्यायालयाकडे ऑनलाईन जुगार ऍप्सवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ऑनलाईन जुगार कंपन्या विराट कोहली आणि तमन्ना भाटिया यांच्यासारख्या सेलिब्रिटींच्या माध्यमातून युवकांचा ब्रेनवॉश करत असून त्यामुळे युवा पिढी जुगाराच्या आहारी जात आहे. एका युवकाने याचकारणाने आ त्मह त्या केल्याची घटना घडली आहे. जुगाराला प्रोत्साहन दिल्याबद्दल विराट आणि तमन्ना या दोघांना अटक करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

विराट कोहली बद्दल बोलायचे झाले तर तो आपली पत्नी अनुष्का शर्मासमवेत लॉकडाऊनमध्ये मुंबईत राहून यंदाच्या आयपीएलची तयारी करत आहे. विराट आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कप्तानी करताना दिसणार आहे.

आयपीएलच्या बाबतीत विराट दुर्दैवी आहे, कारण बरीच वर्षे आरसीबीचे कर्णधारपद सांभाळल्यानंतरही त्याच्या संघाला एकदासुद्धा आयपीएल विजेतेपद मिळवता आले नाही. यंदाच्या आयपीएलचा १३ वा हंगाम १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे तर अंतिम सामना ८ नोव्हेंबरला खेळला जाऊ शकतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *