Breaking News
Home / बातम्या / अदानी यांनी सिमेंटची मोठी कंपनी केली खरेदी; त्यानंतर शेअर्सच्या किंमतीत झाली वाढ

अदानी यांनी सिमेंटची मोठी कंपनी केली खरेदी; त्यानंतर शेअर्सच्या किंमतीत झाली वाढ

भारतामध्ये कमी काळात उद्योग जगतात नाव कमावलेल्या उद्योजकांमध्ये सर्वात पुढे गौतम अदानी यांचे नाव येते. अदानी यांनी विमान व्यवसायापासून ते खाण उद्योगपर्यंत सगळीकडेच स्वतःचे नाव कमावले आहे. आता त्यांनी परत एका नवीन उद्योगात पाऊल टाकले आहे. त्या उद्योगाचे नाव सिमेंट उद्योग असून त्यांनी मोठी खरेदी केली आहे.

त्यांनी स्वित्झर्लंड देशाचे होलसम या कंपनीसोबत १० अरब डॉलरचा व्यवहार केला आहे. त्यांनी आतापर्यंत केलेल्या व्यवहारांमधील हा सर्वात मोठा व्यवहार आहे. अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यानंतर ते आशिया खंडातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यानंतर त्यांनी जवळपास हा व्यवहार २१,००० कोटी रुपयांमध्ये हा उद्योग खरेदी केला आहे.

अदानी यांच्या उद्योग व्यवसायातील हा सर्वात मोठा व्यवहार ठरला आहे. अदानी यांचे अंबुजा सिमेंट आणि एसीसी सिमेंट दोन्ही ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे. अंबुजा मध्ये ६३.९ टक्के आणि ५४.३ टक्के एवढी गुंतवणूक करण्यात आली आहे. या व्यवहारांनंतर अदानी हे भारतातील सर्वात मोठे सिमेंट व्यावसायिक बनणार आहेत. यावेळी या व्यवहारानंतर अदानी यांचे शेअर्स पण वाढले आहेत.

जेव्हा अदानी यांनी या व्यवहारात उडी घेतली तेव्हा आधीपासूनच त्यांच्या दोन कंपन्या आहेत. त्या दोन कंपन्यांनंतर त्यांनी आता स्वतःची कंपनी उघडली आहे. जेव्हा मार्केट एक्सपर्टचे यावर मत घेण्यात आले तेव्हा त्यांनी ही मार्केटसाठी आनंदाची बातमी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर बाजारात पण अदानी यांच्या शेअर्स मध्ये उठाव आला होता.

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published.