Breaking News
Loading...
Home / बातम्या / धक्कादायक; आसाम मिझोराम संघर्षात ‘या’ मराठी अधिकाऱ्याला लागली गोळी; महाराष्ट्रावर दुःखाचे सावट

धक्कादायक; आसाम मिझोराम संघर्षात ‘या’ मराठी अधिकाऱ्याला लागली गोळी; महाराष्ट्रावर दुःखाचे सावट

भारत देशात सतत कोणत्या न कोणत्या राज्यात हिंसाचार चालू असतो. यामध्ये अनेक जणांचा मृत्यू होतो तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान पण होत असते. आसाम राज्यात पण मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळून आला आहे. त्या ठिकाणी एक मराठी अधिकारी जखमी झाला आहे.

त्यांच्या पायाला गोळी लागली असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. आसाम सरकारतर्फे निवेदन जारी करण्यात आले असून त्या संदर्भात ही माहिती देण्यात आली आहे. सोमवार २६ जुलै रोजी झालेल्या संघर्षात सदर घटना घडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर दुःखाचे सावट कोसळले आहे.

Loading...

या ठिकाणी हिंसाचार झाल्यानंतर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वनाधिकारी यांनी हजेरी लावली. त्यावेळी जमाव संतप्त झाला होता. त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीची नुकसान केली आणि निंबाळकर यांच्यावर गोळीबार केला. त्यामुळे गोळी त्यांच्या पायाला लागली.

त्यातच ते गंभीर जखमी झाले आणि त्यांना दवाखान्यात आयसीयू विभागात दाखल करण्यात आले. आसाम आणि मिझोराम सीमेवर गोळीबारात ६ जवानांचा दुःखद मृत्यू झाला आहे. राज्याचे रक्षण करताना या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती आसाम राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री सरमा यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, मी अत्यंत दुःखात ही माहिती सांगत आहे. आसाम राज्याच्या जवानांनी राज्याच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना बलिदान दिले आहे. या जवानांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करत आहे.” आसाम आणि मिझोराम राज्याच्या सीमेवर हिंसा झाल्याची घटना समोर आली आहे.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *