Breaking News
Loading...
Home / बातम्या / आमदार पुत्राच्या लग्नात झाली मोठी गर्दी; कोरोना नियमांना फासला हरताळ

आमदार पुत्राच्या लग्नात झाली मोठी गर्दी; कोरोना नियमांना फासला हरताळ

कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे काही ठिकाणी लग्न आणि कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. लग्नावर बंदी असल्यामुळे काही लोकांनी कमी लोकांमध्ये तर काही जणांनी लग्न नंतर करू म्हणून पुढे ढकलले आहे. पण काही ठिकाणी लग्न पण मोठ्या धुमधडाक्यात होत असल्याचे दिसून आले आहे.

आमदार पुत्राच्या लग्नात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे दिसून आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या ठिकाणी आमदार
पुत्राचे लग्न झाले तेव्हा सदर घटना घडली आहे. अत्यंत थाटामाटात झालेल्या या लग्नाला राजकीय पुढार्यांनी पण हजेरी लावली होती.

Loading...

त्यामुळे हे नियम राजकीय लोकांना लागू नाहीत का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या विवाह सोहळ्याला अनेक मंत्र्यांनी पण हजेरी लावली होती. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या मुलाचे लग्न झाले. त्यांच्या मुलाच्या लग्नाला रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती. या लग्नाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पण उपस्थित होते.

यावेळी भाजपच्या अनेक नेत्यांनी पण हजेरी लावली. राज्यात कोरोनाची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही. तरीही या मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे कोरोना वाढणार तर नाही ना अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात तिसऱ्या लाटेची पण मोठ्या प्रमाणावर शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यामध्ये कोरोनाचे निर्बंध पण कडक करण्यात आले आहेत. कडक करण्यात आलेल्या निर्बंधामुळे व्यापाऱ्यांसोबतच सर्वसामान्य लोकांचे पण मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सोलापूर जिल्ह्यात पण संध्याकाळी ४ नंतर सर्व व्यवहार बंद ठवण्यात येत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *