
महाराष्ट्राच्या राजकारणात कायम कोणत्या न कोणत्या प्रकारे उलथापालथ चालू असते. राज्यात विधानसभा निवडणूका होऊन काही कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे आता आगामी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे सगळ्यांचे डोळे लागून राहिले आहेत. भारतीय जनता पार्टी आता कोणत्या पक्षासोबत युती करते याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
भारतीय जनता पक्षापुढे तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे मोठे आव्हान उभे राहिले आहे. भारतीय जनता पक्ष मनसे पक्षासोबत युती करतो की काय अशी शंका पण सामान्य जनतेला वाटू लागली आहे. स्थानिक पातळीवर भारतीय जनता पक्ष कोणती भूमिका घेतो याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. भारतीय जनता पार्टी आणि मनसे एकत्र येऊन महापालिकेत निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण अजून तरी दोन्ही पक्षांनी युतीची शक्यता नाकारली आहे.
राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांनी नाशिक येथे भेट घेतली आहे. त्यांनी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर भेट घेतली. यावेळी त्या दोघांमध्ये १५ मिनिटे चर्चा झाली. त्यामुळे आता मनसे आणि भाजपा युती करते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, राज ठाकरे आणि मी दोघेही विद्यार्थी चळवळीतील आहोत. आमची फार जुनी मैत्री आहे. राजकारणात आणि समाजकारणात दोस्ती वेग वेगळी असते. व्यवहार करताना त्याचा निर्णय आमची टीम घेत असते. आमचे सगळे निर्णय देवेंद्र फडणवीस हेच घेतली असेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.