बातम्यामनोरंजन

आजोबा व्हायच्या वयात हा शोधतोय तिसरी बायको; भाजपच्या या नेत्याने केले वादग्रस्त विधान

सोशल मीडियावर बॉलिवूड मधील अभिनेता आणि अभिनेत्री दरवेळी वेग वेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. अभिनेता अमीर खान आणि किरण राव त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर दोघांनाही ट्रोल केले जात आहे.

यावरून राजकीय वादंग पण मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येत आहे. भाजप खासदार सुधीर गुप्ता यांनी अमिर आणि किरण यांच्या घटस्फोट चर्चेवर पण वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आजोबा व्हायच्या वयात हा आता तिसरी बायको शोधत आहे.

सोशल मीडियावर पण यावरून मोठ्या प्रमाणावर वाद होत असल्याचे दिसून आले आहे. सुधीर गुप्ता यांनी म्हटले आहे की, अमीर खान यांनी पहिले लग्न झाल्यानंतर रीना दत्त यांना पण घटस्फोट दिला. किरण राव पासून त्याला एक मुलगा आहे. आता आजोबा व्हायच्या वयात तो तिसरे लग्न करताना दिसून येत आहे.

अमीर खान आणि किरण राव यांनी संयुक्तपणे प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यावर त्यांनी म्हटले आहे की, ‘विश्वास, आदर आणि प्रेम या आघाड्यांवर आमचे ऋणानुबंध घट्ट होत गेले. आता आम्हाला आयुष्याच्या नव्या टप्प्याला सामोरे जायचे आहे. या प्रवासात आम्ही नवरा-बायको असणार नाही. आम्ही मुलांसाठी सहपालक असणार आहोत.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, एकमेकांच्या कुटुंबीयांसाठी सदैव सोबत असू. विभक्त होण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी आम्ही विचारपूर्वक घेतला. यासंदर्भात औपचारिक प्रक्रिया आम्ही पूर्ण करू. आम्ही स्वतंत्र राहू मात्र एकमेकांच्या कुटुंबाचा भाग असू. आझाद या आमच्या मुलाच्या संगोपनाची जबाबदारी आमच्यावर एकत्रितपणे आहे. चित्रपट, पाणी फाऊंडेशन तसेच अन्य आवडीच्या प्रकल्पांसाठी आम्ही एकत्रितपणे काम करू’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button