Breaking News
Loading...
Home / नवीन खासरे / भारतातील ६ पछाडलेली हॉटेल्स, जिथे मुक्कामासाठी पैशापेक्षा धाडसाचीच जास्त गरज असते

भारतातील ६ पछाडलेली हॉटेल्स, जिथे मुक्कामासाठी पैशापेक्षा धाडसाचीच जास्त गरज असते

भुतांच्या कथा ऐकणे आणि भयावह ठिकाणी जाणे ही जरी सर्वांना जमणारी गोष्ट नसली तरी त्याबद्दल जाणून घ्यायला सर्वांनाच आवडते. आपणही आपल्या मित्रांसमवेत अनेकदा एखाद्या हॉरर ठिकाणी जाण्याचा प्लॅन केला असेल. असे प्लॅन बनत असतात, तुटत असतात ही गोष्ट वेगळी. परंतु तुम्हाला माहित आहे की याव्यतिरिक्त आपल्या देशात अशीही काही हॉटेल्स आहेत जिथे जाण्यासाठी तुम्हाला केवळ पैशांची नाही, तर धाडसाचीही प्रचंड आवश्यकता असते. ही हॉटेल्स भीतीदायक ठिकाणे म्हणून प्रसिद्ध आहेत…

१) मॉर्गन हाऊस, कालिंपाँग (पश्चिम बंगाल) :

Loading...

१९३० मध्ये मॉर्गन हाऊस हे जॉर्ज मॉर्गनचे खासगी निवासस्थान होते. हे ठिकाण पश्चिम बंगालमधील कालिंपाँग येथे आहे. लेडी मॉर्गनच्या अकाली निधनानंतर मॉर्गन कुटुंबाने हे घर सोडून दिले होते. तेव्हापासून लेडी मॉर्गनचा आत्मा या घरात भटकत आहे आणि इथे येणाऱ्या यजमानांनी तिच्या उंच टाचेच्या चपलांचा आवाज ऐकल्याचे सांगितले जाते.

२) हॉटेल लेक व्हिव, ऊटी (तामिळनाडू) :

हिरव्यागार टेकड्यांच्या मधोमध स्थित असणाऱ्या या हॉटेलमध्ये पौर्णिमेच्या रात्री एका खोलीतील बेडशीट अनाकलनीयपणे हवेत उडाल्याचे पाहून हॉटेलमधील यजमान हादरुन गेले होते. इथल्या स्थानिक लोकांचे सांगणे आहे की हे हॉटेल भयानक आणि धोकादायक आहे. सूर्यास्तानंतर इथे न जाणेच ठीक आहे.

३) वेलकम हॉटेल द सेवॉय, मसूरी (उत्तराखंड) :

मसूरीमधील वेलकम हॉटेल द सेवॉय हे भारतातील सर्वात भीतीदायक हॉटेल मानले जाते. १९१० मध्ये इथे काही विचित्ररित्या लेडी गार्नेट ऑर्मेचे निधन झाले होते. काही वर्षांनंतर लेडी गार्नेटवर उपचार करणार्‍या डॉक्टरचेही निधन झाले. तेव्हापासून या हॉटेलमध्ये भीतीदायक गोष्टींचा अनुभव येतो.

४) फर्न हिल्स रॉयल पॅलेस, ऊटी (तामिळनाडू) :

२००२ मध्ये उटीच्या सर्वात प्रसिद्ध अशा फर्न हिल रॉयल पॅलेसमध्ये राज चित्रपटाचे शूटिंग झाले होते. शूटिंगदरम्यान कोरिओग्राफर आणि सर्व क्रू मेंबर्सना कोणीतरी चालत असल्याचे जाणवले, पण कोणी दिसले नाही.ज्या मजल्यावर ही घटना घडल्याचे समोर आले, तो मजलाच या हॉटेलमध्ये नसल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले.

५) द ताजमहाल पॅलेस, मुंबई (महाराष्ट्र) :

भारतातील सर्वात प्रसिद्ध हॉटेल असे मुंबईतील ताजमहाल पॅलेस त्याच्या भव्यतेसोबतच भीतीदायक घटनांसाठीही प्रसिद्ध आहे. हॉटेल बनवणारे इंग्लंडला निघून गेले, पण परत आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की हॉटेलची दिशा ठीक नाही. यामुळे व्यथित होऊन त्यांनी हॉटेलमध्येच आत्महत्या केली. तेव्हापासून चेंबरचा आत्मा आजही जुन्या विंगमध्ये भटकत असल्याचे मानले जाते.

६) बृजराज भवन पॅलेस हॉटेल, कोटा (राजस्थान) :

ब्रिटिश राजवटीत हा राजवाडा मेजर बर्टन यांचे निवासस्थान होता. १८५७ च्या उठावादरम्यान बर्टन आणि त्याचे कुटुंब या वाड्याच्या दालनातच मारले गेले. यानंतर १९८० मध्ये याची डागडुजी करुन हॉटेल म्हणून उघडले गेले. परंतु येथे राहणाऱ्या यजमानांना इथे विचित्र घटनांचा अनुभव आला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *