Breaking News
Loading...
Home / बातम्या / जग जिंकणारे हे पाच जगज्जेते चक्क एका डासासमोर झाले होते पराभूत

जग जिंकणारे हे पाच जगज्जेते चक्क एका डासासमोर झाले होते पराभूत

आंतरराष्ट्रीय मंचावर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार जवळपास जगातील अर्ध्या लोकसंख्येसमोर मलेरियाचे संकट आ वासून उभे आहे. केवळ एकट्या २०१६ मध्ये मलेरियाच्या २१ कोटी ६० लाख घटना समोर आल्या होत्या. यापैकी ७ लाखांहून अधिक लोकांना या रोगाने आपला जीव गमवावा लागला होता. या आजाराला केवळ सर्वसामान्य लोकच बळी पडले नाहीत, तर डासांच्या छाव्याने इतिहासातील मोठमोठे योद्धे देखील पराजित झाले आहेत. जगात कुणीही ज्यांचे वाकडे करू शकले नाही, ते जगज्जेते एका दारासमोर हरले. चला तर जाणून घेऊया त्या पाच जगज्जेत्यांबद्दल…

१) चंगेजखान, मंगोल प्रशासक : मंगोल साम्राज्य उभे करणारा चंगेजखान त्याच्या संघटनकौशल्य, निर्दयता आणि साम्राज्याच्या विस्तारासाठी ओळखला जातो. त्याने एकामागून एक असे मंगोलिया पासून युरोप आणि आशिया खंडातील अनेक प्रदेशात आपले साम्राज्य उभे केले होते. असे सांगितले जाते की १९२७ च्या उन्हाळ्यात चंगेजखानला मलेरिया झाला होता. अनेक दिवस त्याने उपचार घेतले, परंतु अखेर वयाच्या ६० व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.

Loading...

२) वास्को-द-गामा, पोर्तुगीज खलाशी : इतिहासामध्ये वास्को-द-गामाची ओळख समुद्रमार्गे भारतात आलेला पहिला युरोपियन व्यक्ती अशी आहे. त्याने भूमध्य सागराऐवजी अटलांटिक महासागर आणि हिंदी महासागरामार्गे आफ्रिकेच्या किनाऱ्याला वळसा घालून इ.स.१४९८ मध्ये भारताकडे येण्याचा मार्ग शोधला होता. त्यानंतर तो दोनदा भारतात आला. तिसऱ्या भारत प्रवासावेळी त्याला मलेरिया झाला. त्यातच १५२४ मध्ये कोचीन येथे त्याचा मृत्यू झाला.

३) ख्रिस्तोफर कोलंबस, इटालियन खलाशी : ख्रिस्तोफर कोलंबस म्हणजे पहिला युरोपियन व्यक्ती ज्याने अमेरिका खंडाचा शोध लावला. भारताचा शोध घ्यायला निघालेला कोलंबस अटलांटिक महासागरातून प्रवास करत एका किनाऱ्यावर पोहोचला आणि तिथेच अमेरिका खंडाचा शोध लागला. इ.स.१५०३ मध्ये आपल्या चौथ्या समुद्रसफरीला निघालेल्या कोलंबसला मलेरिया झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

४) नेपोलियन बोनापार्ट, फ्रेंच प्रशासक : फ्रेंच राज्यक्रांतीनंतर उदयाला आलेल्या नेपोलियन बोनापार्टला जगातील महान सेनापती मानले जाते. १८०१ मध्ये फ्रान्समधील हैती विद्रोह रोखण्यासाठी आपले सैन्य पाठवले, परंतु वादळामुळे त्या भागात मलेरियाची साह आली आणि नेपोलियनचे सैन्य मलेरियाचा बळी पडले. त्यामुळे नेपोलियनला हा विद्रोह रोखता आला नाही आणि त्याचे सैन्य पराभूत झाले.

५) सिकंदर, जगज्जेता : लहानपणापासूनच जग जिंकण्याचे स्वप्न बाळगलेल्या सिकंदराने आपल्या कार्यकाळात इराण, सीरिया, मिस्र, फिनिशिया, जुदेआ, बॅक्ट्रीया आणि भारताच्या पंजाब भागावर विजय मिळवला. त्याला जगज्जेता सिकंदर म्हणून ओळखले जाते. परंतु भारतातून परतल्यानंतर त्याला मलेरिया आणि कावीळ झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *