Breaking News
Loading...
Home / बातम्या / या ५ टीव्ही अभिनेत्री कधीच करत नाहीत छोटे कपडे घालून टीव्हीवर अंगप्रदर्शन..

या ५ टीव्ही अभिनेत्री कधीच करत नाहीत छोटे कपडे घालून टीव्हीवर अंगप्रदर्शन..

टीव्ही इंडस्ट्री मध्ये एकापेक्षा एक सुंदर अभिनेत्रीचा भरणा आहे. या अभिनेत्री मालिकांमध्ये काम करून घराघरात प्रसिद्ध झालेल्या आहेत. आज या अभिनेत्रींना फॉलो करणाऱ्या फॅनची संख्या बॉलिवूडच्या अभिनेत्रींपेक्षा कमी नाहीये. या अभिनेत्री आपल्या प्रतिभाने बॉलिवूडच्या मोठमोठ्या अभिनेत्रींना टक्कर देतात. या अभिनेत्रींनी सिद्ध केलं आहे कि घराघरात प्रसिद्ध होण्यासाठी छोटे कपडे घालणे गरजेचे नाहीये तर टीव्हीवर कॅमेऱ्यासमोर पूर्ण कपडे घालून आणि अंगप्रदर्शन न करता देखील प्रसिद्धी मिळवता येते.

अशाच अंगप्रदर्शन न करता या ५ अभिनेत्री आज घराघरात पोहचल्या आहेत-

Loading...

१. दिव्यांक्या त्रिपाठी- दिव्यांकाचे नाव आज टीव्हीच्या टॉपच्या अभिनेत्रींनमध्ये आहे. ती गाजलेल्या ‘ये है मोहब्बतें’ मालिकेत इशिता भल्लाचा रोल करताना नजरेस पडली होती. तिची फॅन फॉलोविंग आज बॉलिवूडच्या अभिनेत्रींनपेक्षा कमी नाहीये. दिव्यांका ने आपल्या करिअरची सुरुवात ‘बनूं में तेरी दुल्हन’ या मालिकेपासून केली होती. ग्लॅमरस दुनियेत एवढ्या वर्षांपासून असताना देखील तिने आजपर्यंत छोट्या कपड्याला हाथ लावला नाहीये.

२. परिधी शर्मा- परिधिने झी टीव्हीवरील जोधा अकबर या मालिकेत प्रसिद्ध जोधाची भूमिका साकारली होती. तिने हि भूमिका खूप चांगल्या प्रकारे निभावली होती. २०१६ मध्ये ती आई बनली आणि तिने छोट्या पडद्याला रामराम ठोकला. याशिवाय ती सोनीच्या ‘पटियाला बेब्स’मध्ये देखील दिसली आहे. परिधीने देखील आजपर्यंत अंगप्रदर्शन नाही केलं न कधी छोटे कपड घातले.

३. कृतिका सेंगर- कृतिका हि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. कृतिका ‘पुनर्विवाह’, ‘झांसी की रानी’, ‘कसम तेरे प्यार की’, ‘सर्विस वाली बहु’ या गाजलेल्या सीरिअल मध्ये दिसली आहे. तिने देखील नेहमीच छोट्या कपड्याना ना केली आहे. तिला बोल्ड सिन देखील आवडत नाहीत. ती याबद्दल अगोदरच डायरेक्टरला माहिती देते.

४. अलिशा पवार- अलिशा देखील सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. ‘इश्क में मरजावां’, ‘जमाई राजा’ आणि ‘थपकी प्यार की’ या मालिकेत दिसली आहे. २३ वर्षाची अलिशा आपल्या नम्रतेसाठी ओळखली जाते. तिने देखील प्रसिद्धीसाठी कधीच बोल्डनेसचा आधार घेतला नाही. ती देखील छोट्या कपड्याना नेहमीच नाही म्हणते.

५. दीपिका कक्कड- ‘ससुराल सिमर का’ मध्ये सिमरची भूमिका साकारणारी दीपिका बिगबॉसची देखील विजेता राहिली आहे. दीपिकाने शोएब इब्राहिम या टीव्ही अभिनेत्यासोबत लग्न केलं आहे. दीपिका आज टीव्ही इंडस्ट्रीमधील एक मोठं नाव आहे. पण ती देखील छोटे कपडे घालण्याचा ऑफर नाकारते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *