Breaking News
Loading...
Home / बातम्या / २०२१ च्या जनगणनेवेळी विचारले जाणार हे ३१ प्रश्न

२०२१ च्या जनगणनेवेळी विचारले जाणार हे ३१ प्रश्न

भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे. भारतात दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. १८७२ साली भारतातील पहिली जनगणना झाली होती. २०२१ साली होणारी जनगणना ही देशातील १६ वी राष्ट्रीय जनगणना असणार आहे. या जनगणनेसाठी मोबाईल ऍपदेखील वापरले जाणार आहे. ही जनगणना १ मे २०२० पासून सुरु होणार आहे.

जनगणना अधिनियमाच्या कलम ८ (१) नुसार होणार असून सरकारने सर्व जनगणना कार्यालयांना जनगणनेसाठी आवश्यक असणाऱ्या प्रश्नांची यादी सोपवली आहे. या यादीमध्ये कोणकोणत्या प्रश्नांचा समावेश आहे ते आपण पाहणार आहोत, जेणेकरुन जनगणना अधिकारी आपल्या घरी येतील तेव्हा तुम्हाला उत्तरे देण्यात अडचणी येणार नाहीत.

Loading...

२०२१ च्या जनगणनेसाठी विचारले जाणार हे ३१ प्रश्न

१) इमारत क्रमांक (महापालिका किंवा स्थानिक प्राधिकरण क्रमांक), २) घर क्रमांक, ३) घराचे छप्पर, भिंत आणि छताच्या बांधकामात कोणत्या वस्तू वापरण्यात आलेल्या आहेत, ४) घराचा उपयोग कोणत्या उद्देशाने केला जात आहे, ५) घराची स्थिती

६) घराचा क्रमांक, ७) घरात राहणाऱ्या लोकांची संख्या, ८) कुटुंबप्रमुखाचे नाव, ९) कुटुंबप्रमुख स्त्री आहे की पुरुष, १०) कुटुंबप्रमुख अनुसूचित जाती / जमाती किंवा इतर वर्गातील आहे का ?

११) घराची मालकी स्थिती, १२) घरात असलेल्या खोल्यांची संख्या, १३) घरातील विवाहित जोडप्यांची संख्या, १४) पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत, १५) घरातील पाण्याच्या स्त्रोतांची उपलब्धता,

१६) वीजेचा मुख्य स्रोत, १७) शौचालय आहे का नाही, १८) शौचालय कोणत्या प्रकारचे आहे, १९) सांडपाणी व्यवस्था, २०) स्वच्छतागृह आहे का नाही, २१) स्वयंपाकघर आहे किंवा नाही, त्यामध्ये एलपीजी / पीएनजी कनेक्शन आहे किंवा नाही ?

२२) स्वयंपाक बनवण्यासाठी वापरले जाणारे इंधन, २३) रेडिओ / ट्रान्झिस्टर, २४) दूरदर्शन, २५) इंटरनेट उपलब्ध आहे की नाही, २६) लॅपटॉप / संगणक आहे किंवा नाही, २७) दूरध्वनी / मोबाइल फोन / स्मार्टफोन, २८) सायकल / स्कूटर / मोटरसायकल / मोपेड, २९) कार / जीप / व्हॅन, ३०) घरात प्रामुख्याने कोणती धान्ये वापरली जातात, ३१) मोबाइल नंबर ( जनगणनेसंबंधी संपर्क साधण्यासाठी)

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *