Breaking News
Loading...
Home / बातम्या / भाजपसोबत असलेले ‘हे’ दाेन आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर…

भाजपसोबत असलेले ‘हे’ दाेन आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर…

राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्याला महाविकासआघाडीने विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर पूर्णविराम मिळाला. महाराष्ट्रात २४ ऑक्टोबरला विधानसभेचा निकाल लागला आणि राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठे भूकंप घडले.

निवडणुकीपूर्वी भाजपच सत्तेत येईल या आशेने अनेकांनी मेगाभरतीमध्ये भाजप प्रवेश केला होता. त्यातील अनेकांना निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. तर निकालानंतर देखील भाजपची सत्ता येईल असे चित्र होते. त्यामुळे निवडून आलेल्या अपक्ष आमदारांचा भाजपकडे ओढा होता. यातील अनेकजण हे भाजपच्या छुप्या पाठिंब्यावर निवडून आले होते.

Loading...

मात्र आता भाजप सत्तेपासून दूर गेल्यानंतर या आमदारांना सत्तेचे वेध लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेले संजयमामा शिंदे यांनी भाजप सत्तास्थापन हे दिसताच आपला पाठिंबा जाहीर करून टाकला होता. त्यावेळी सर्वांना आश्चर्य व्यक्त केले. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच, संजयमामा यांनी निर्णय बदलत राष्ट्रवादीला पाठिंबा दर्शविला.

सत्तेसोबत राहून मतदारसंघातील विकासकामांना गती देता येते अशी त्यांची भावना आहे. संजय मामा शिंदे हे बहुमत चाचणीच्या वेळीच महाविकास आघाडीच्या बाजूने गेले होते. तर आता सरकार बहुमताने स्थापन झाल्यानंतर भाजपसोबत असलेले २ आमदार हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.

हे २ आमदार धरणार राष्ट्रवादीची वाट-

संजयमामा शिंदे आणि किशोर जोगरेवार यांनी यापूर्वीच महाविकास आघाडीला पाठींबा जाहीर केला आहे. हे दोघेही यापूर्वी भाजपसोबत होते. या दोघानानंतर आता बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे.

विधानसभेतील महाविकास आघाडीच्या बहुमताच्या वेळी राजेंद्र राऊत हे गैरजहर होते. ते भाजपसोबत होते खरे पण आता सत्तांतर झाल्याने आमदार राऊत हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळत आहे. त्यांनी निवडणुकीत राष्ट्रवादीतून सेनेत गेलेल्या माजी मंत्री दिलीप सोपल यांचा चुरशीच्या लढतीत २१९० मतांनी पराभव केला होता.

राजेंद्र राऊत यांच्यासोबतच लोहा- कंधारचे श्यामसुंदर शिंदे हे देखील राष्ट्रवादीसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. श्यामसुंदर शिंदे हे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *