Breaking News
Loading...
Home / बातम्या / अशा प्रकारच्या १० विचित्र वस्तू देखील ऑनलाइन विकल्या जातात

अशा प्रकारच्या १० विचित्र वस्तू देखील ऑनलाइन विकल्या जातात

गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हटले जाते. परंतु विक्री करण्याच्या अट्टाहासापोटी बाजारात अशाही काही गोष्टी विकल्या जातात ज्यांची आपल्याला काही खास गरज नसते. त्यांच्या विक्रीबद्दल बोलायचं राहू द्या, त्यातल्या काही गोष्टींचे डिझाइन आणि पॅकेजिंग देखील असे असते की आपण ते खरेदी देखील करु शकत नाही. अशाच काही ऑनलाईन विकल्या जाणाऱ्या विचित्र प्रकारच्या १० प्रोडक्टसबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

१) लिकी ब्रश : हा ब्रश तोंडात धरुन आपण आपल्या मांजरीलाचाटू शकता. यामुळे मांजरीला आतून चांगले वाटते आणि आपल्या आतील प्राणी बाहेरुन दिसेल. २) नेल करेक्शन टूल : पायातील नखांच्या बाजूने जी लहान नखे येतात ती अनेकदा त्रासदायक असतात. हे मशीन त्यांना ठीक करण्यासाठी तयार केली गेली आहे. ही मशीन पहिले की असे वाटते ही नखे उखडून टाकेल की काय ?

Loading...

३) प्लंगर: पाश्चात्य रचनेची कमोड साफ करताना अडचण येते. कमोडच्या आतमध्ये खोलवर स्वच्छता करण्यासाठी प्लंगरची प्लनरची रचना करण्यात आली आहे. ४) लेडी अँटी मंकी बट पावडर : असले नाव असताना जर कोणी ही पावडर खरेदी करत असेल तर हे त्या ग्राहकाचे मोठेपण आहे. विशेषतः स्त्रियांसाठी बनविलेली ही पावडर घामापासून मुक्त होण्यासाठी विशिष्ट ठिकाणी लावली जाते.

५) बॅक हेअर शेवर : जे लोक पाठीवरील केसांमुळे त्रस्त आहेत आणि त्यापासून मुक्त होऊ इच्छितात, त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. ६) टॅम्पॉन फ्लास्क : स्त्रिया मासिक पाळीच्या दरम्यान टॅम्पॉनचा उपयोग पॅडच्या रूपात करतात. या टॅम्पॉनच्या रचनेवरुनच कंपनीने असा फ्लास्क बनवला आहे, ज्यामध्ये दारूदेखील लपवता येऊ शकते.

७) पिंपल पॉपिंग किट : चेहऱ्यावरची पिंपल फोडणे हा बर्‍याच लोकांचा आवडता टाईमपास असतो. अशा लोकांना समोर ठेवून हे किट बनवले गेले आहे. ८) बट पॅड : नावावरुनच समजले असेल हे पॅड कुठे लावतात. हे पॅड लावल्याने दुर्गंधीयुक्त वास बाहेर पडत नाही.

९) कॉम्फी पॉट : हिवाळ्यात अनेकजण नाक चोंदल्याची तक्रार करतात. या पॉटचा उपयोग तुम्ही नाक मोकळे करुन श्वासोच्छ्वास सुरु करण्यासाठी करु शकता. १०) नोज वॅक्स किट : आजकाल लोकांना नाकातील केससुद्धा नको झाले आहेत. एक तर प्रदूषण इतके वाढत आहे आणि लोकांनी नाकात केस ठेवले नाहीत तर जगण्याची काही आशाच नाही. यापैकी कोणत्या ऑनलाईन ऑर्डर करण्यास आपण इच्छुक आहात ?

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *