बातम्याराजकिय

एक्झिट पोलनुसार मनसेचे किती आमदार निवडून येणार माहिती का?

विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडून २ दिवस झाले. अवघ्या काही तासानंतर आता मतमोजणी होणार आहे. राज्यभरात ६०. ४८ टक्के मतदान झालं आहे. मतमोजणीला अवघे काही तास उरल्याने आता सर्वांची धाकधूक वाढली आहे. विविध चॅनेल्सने घेतलेल्या एक्झिट पोलमधून राज्यभरात महायुतीला पुन्हा स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे चित्र आहे.

वेगवेगळया वृत्त वाहिन्यांवर एक्झिट पोल्सचे जे आकडे जाहीर झाले आहेत त्यामध्ये महायुतीलाच बहुमत मिळणार असल्याचे दिसते पण विजयी उमेदवाराचा आकडा प्रत्येक एक्झिट पोलनुसार वेगळा असणार आहे. या निवडणुकीत मनसेने देखील अनेक ठिकाणी पूर्ण ताकतीने उमेदवार उभे केले होते.

राज ठाकरे यांनी लोकसभा न लढवण्याचा निर्णय चांगलाच चर्चिला गेला. विधानसभा निवडणुकीसाठी मात्र त्यांनी अनेक ठिकाणी चांगले उमेदवार दिले आहेत. २००९ च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने करिष्मा केला होता. मनसेचे तेव्हा १३ आमदार निवडून आले होते. पण २०१४ मध्ये मनसेचा अवघा एक आमदार निवडून आला.

मनसेची राज्यभरात वाताहत झाल्याचं बघायला मिळालं. त्यामुळे मनसेसाठी हि निवडणूक खूप महत्वाची आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरेंनी राजकीय इतिहासात पहिल्यांदा एका सक्षम विरोधी पक्षासाठी मनसेला साथ द्या असं आवाहन राज्यातील जनतेला केलं होतं. राज्यभरात मनसेने १०१ उमेदवार उभे केले आहेत.

मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद याठिकाणी राज ठाकरेंच्या सभा झाल्या, राज ठाकरेंच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळत होती. एक्झिट पोल हे मनसेसाठी निराशाजनक असले तरी मनसेला या निवडणुकीत आपले चांगले उमेदवार निवडून येतील असा विश्वास आहे.

एक्झिट पोलनुसार मनसेचे किती आमदार निवडून येणार?

सर्व एक्झिट पोलमध्ये मनसेला कुठेही जागा मिळेल असं दाखवण्यात आलं नाहीये. मनसेला एकाही जागा न दिल्याबद्दल सोशल मीडियावर अनेक मनसे समर्थकांनी आपली नाराजीही जाहीर केली व एक्झिट पोल्सच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.

यंदाची निवडणूक मनसेसाठी अस्तित्वाची लढाई आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांना ४-५ जागांवर विजय मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र एक्झिट पोलनुसार मनसेला एकदा अपयश मिळताना दिसत आहे.

पोल डायरीचा एक्झिट पोल सांगतो मनसेचे येऊ शकतात ५ आमदार निवडून-

सर्व एक्झिट पोल मनसेसाठी निराशाजनक असले तरी पोल डायरीचा पोल याला अपवाद ठरला आहे. पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार मनसेचे १-५ आमदार निवडून येऊ शकतात.

पोल डायरीनुसार भाजपाला १२१ ते १२८, शिवसेनेला ५५ ते ६४, काँग्रेस ३९ ते ४६, राष्ट्रवादी काँग्रेसला ३५ ते ४२, वंचित बहुजन आघाडीला १ ते ४ जागा मिळू शकतात. पोल डायरीनुसार मनसेचे विदर्भात ० ते २ आमदार निवडून येऊ शकतात.

मनसेने माहिम, कल्याण ग्रामीण, कोथरुड या तीन ठिकाणी अटीतटीची लढत दिली आहे. तसेच पुण्यातील हडपसर या मतदारसंघात देखील मनसेने चांगली लढत दिली आहे. मनसेचा विदर्भात वणी मतदारसंघात विजय होईल असे सांगण्यात येत आहे. निकाल लागल्यानंतरच हे चित्र आता स्पष्ट होईल.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button