बातम्याराजकिय

स्मृती इराणी यांनीही घातली होती भगव्या रंगाची बिकिनी, TMC नेत्याने थेट व्हिडिओच केला शेअर

पठाण चित्रपटातील ‘बेशरम’ या गाण्यावरून जोरदार वाद सुरू आहे. या गाण्यावर हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप आहे. हिंदुत्ववादी संघटनांचे म्हणणे आहे की, ‘बेशरम रंग’ या गाण्यात भगवा हा बेशरम रंग दाखवला आहे. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. या वादात भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्ष आमनेसामने आले आहेत.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी घातली होती भगवी बिकिनी

याप्रकरणी टीएमसी नेते रिजू दत्ता यांनी स्मृती इराणींचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये स्मृती इराणी भगव्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला आहे. हा व्हिडिओ 1998 च्या मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेचा आहे. व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी लिहिले की, “चित्रपटात भगवा बिकिनी परिधान केल्याबद्दल शाहरुख खानवर बहिष्कार घालणाऱ्या बॉयकॉट पथकातील द्वेष पसरवणाऱ्या इडियट्सनी स्मृती इराणीवरही बहिष्कार टाकावा कारण त्यांनी 1998 मध्ये ‘भगवी बिकिनी’ घातली होती.” पण ती केंद्रीय कॅबिनेट मंत्री. तिच्यावर कारवाई का नाही?”

भाजपला प्रत्युत्तर देत व्हिडिओ ट्विट केला

रिजू दत्ता यांनी भाजपचे प्रवक्ते अमित मालवीय यांच्या ट्विटला उत्तर म्हणून स्मृती इराणी यांचा व्हिडिओ ट्विट केला आहे. अमित मालवीय यांनी कोलकाता फिल्म फेस्टिव्हलचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये गायक अरिजित सिंग ‘रंग दे तू मोहे गेरुआ…’ गाणे गात आहे. अमित मालवीय यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “ही भावनांची संध्याकाळ होती. मिस्टर बच्चनपासून ते अरिजितपर्यंत, ज्यांनी ममता बॅनर्जींना बंगालचे भविष्य भगवे आहे याची आठवण करून दिली…”

भगवा रंग कोणाची संपत्ती नाही

रिजू दत्ता यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, “भगवा ही भाजपची वैयक्तिक मालमत्ता आहे का? त्यांना तसे करण्याचा अधिकार कोणी दिला? दीपिका पदुकोणसारख्या महिलांना त्यांच्या आवडीचे भगवे कपडे परिधान करण्यावरून शिवीगाळ करत असतील, तर त्यांनी हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या केंद्रीय मंत्र्याने 1998 मध्ये भगव्या रंगाची बिकिनी घातली होती.”

काय आहे संपूर्ण प्रकरण?

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा पठाण हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे ‘बेशरम रंग’ हे गाणे यापूर्वीच रिलीज झाले आहे. हे गाणे अनेकांना आवडले आहे, तर अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. हे गाणे चित्रपटातून काढून टाकावे अन्यथा चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात येईल, असे काही हिंदू संघटनांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button