Breaking News
Home / बातम्या / सर्वाना खूप आशा असलेल्या ऑक्सफर्डच्या लसीबाबत आली ध क्कादायक बातमी! एका व्यक्तीमुळे..

सर्वाना खूप आशा असलेल्या ऑक्सफर्डच्या लसीबाबत आली ध क्कादायक बातमी! एका व्यक्तीमुळे..

कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोना संकटावर एकमेव आशेचा किरण हा त्यावरील लसच असणार आहे. जगभरात अनेक देश कोरोनावरील लस बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जगातील सध्या बनत असलेल्या ४-५ देशांच्या लसीकडून जगाला आशा आहेत. याचपैकी एक लस म्हणजे ऑक्सफर्डची. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीकडून जगाला खूप आशा आहेत.

हि लस सध्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. या लसीच्या पहिल्या २ मानवी चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. तिसरी चाचणी सध्या सुरु होती. पण या चाचणीदरम्यान एक ध क्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोनाविरोधातल्या लढाईत हे एक अपयशच म्हणावं लागेल.

या अपयशामुळे लढ्याला मोठा ध क्का बसला आहे. अ‍ॅस्ट्रॅजेनेका(AstraZeneca) आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लस(Oxford covid-19 Vaccine) ची मानवी चाचणी सुरु होती. पण या चाचणीत एक व्यक्ती आजारी पडला आहे. मानवी चाचणीदरम्यान या व्यक्तीला हि लस देण्यात आली होती. पण हा व्यक्ती आता आजारी पडला असून व्यक्तीच्या आजाराबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही.

या लसीला AZD 1222 असे नाव देण्यात आले. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन(WHO)च्या मते, जगातील इतर लसींच्या चाचण्यांच्या तुलनेत हे आघाडीवर होते. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसीकडे भारतासह अनेक देशांचे लक्ष लागून आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मार्केटमध्ये पहिले स्थान मिळवेल, अशी आशा आहे. तसेच तज्ज्ञांचेही मत आहे.

या व्यक्तीच्या आजारी पडल्यामुळे लसीचे ट्रायल आता थांबवण्यात आले आहे. स्वतंत्र तपासणीनंतर लसीची चाचणी पुन्हा सुरु केली जाऊ शकते. लस चाचणीचा हा तिसरा टप्पा आहे. या टप्प्यात हजारो लोक सामील होत असतात. त्यामुळे यासाठी बऱ्याचदा मोठा कालावधी लागू शकतो. हि लस तिसऱ्या टप्प्यात ३०००० लोकांना देण्यात आली आहे.

ऑक्सफोर्ड विद्यापीठात कोरोना व्हायरस लसीची चाचणी थांबविण्याची ही दुसरी वेळ आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “मोठ्या चाचणीत आजारी पडण्याची सर्व शक्यता आहे, परंतु काळजीपूर्वक तपासणी करण्यासाठी स्वतंत्र तपासणी करणे फार महत्त्वाचे आहे.”

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *