बातम्याराजकिय

संपूर्ण महाराष्ट्राची शेतकरी कर्जमाफी करू शकतो एवढी संपत्ती आहे या उमेदवाराकडे..

निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये सर्वाना उत्सुकता असते कि आपल्या नेत्याकडे किती संपत्ती आहे याची माहिती त्यांना प्रतिज्ञापत्रावरून कळते किंवा महाराष्ट्रात सर्वात श्रीमंत नेता कोण ? या संबंधी माहिती आपणास या निवडणुकीच्या काळात कळते. याच माध्यमातून कोण नेता किती श्रीमंत आहे, याचा अंदाज नागरिकांना येतो.

मुंबई भाजपा अध्यक्षपदी नियुक्ती झालेले मंगल प्रभात लोढा या शर्यतीत सर्वात पुढे आहे. त्यांची संपत्ती बघून अनेकांना धडकी भरेल हे नक्की आहे. तर मंगल प्रभात लोढा हे मुंबईतील मलबार हिलचे भाजप आमदार आहे. मागे आलेल्या देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर्सच्या यादीत देखील मंगल प्रभात लोढा यांचे नाव आले होते.

1995 पासून ते सलग पाच वेळा भाजपच्या तिकीटावर आमदारपदी निवडून येत आहेत. ग्रोह हुरुन ही संस्था देशातील १०० श्रीमंत बांधकाम व्यवसायिकांची यादी प्रसिद्ध करते. या यादीत मंगल लोढांनी पहिला क्रमांक पटकावला होता. लोढा यांच्या फर्म कडे तब्बल २७ हजार १५० कोटींची संपत्ती असून गेल्या वर्षी याच यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर होते.

वैयक्तिक संपत्ती एवढी आहे

मंगलप्रभात लोढा यांनी एकूण ४४१ कोटींची चल-अचल संपत्ती घोषित केली आहे. या संपत्तीशिवाय त्यांच्यावर २८३ कोटींचं कर्ज असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. १४ लाख रुपयांची जग्वार कार असून बॉन्ड आणि शेअर्समध्ये अन्य गुंतवणूक आहे. लोढा यांचे कुटुंबीय रिअल इस्टेट व्यवसायात असून दक्षिण मुंबईत त्यांचे पाच फ्लॅट आहेत. राजस्थानातही त्यांचा प्लॉट आहे. लोढा आणि त्यांची पत्नी यांचेही मलबार हिल भागात घर आहे.

संपत्ती मध्ये झाली १० पट वाढ

१० वर्षांपूर्वी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत स्थावर २४ आणि जंगम २४ अशी ४८ कोटींची मालमत्ता आणि ७ कोटींचं कर्ज असल्याचं लोढा यांनी सांगितलं होतं. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी २०० कोटींची संपत्ती जाहीर केली होती. तर आता त्यांच्या कडे ४४१ कोटी म्हणजे १० पट वाढ झाली आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्याकडील माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button