Breaking News
Home / बातम्या / शिवसेनेशी जवळीक असल्याने चर्चेत आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे नेमके कोण आहेत?

शिवसेनेशी जवळीक असल्याने चर्चेत आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे नेमके कोण आहेत?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फो टकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृ तदेह काल सापडला. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव खूप चर्चेत आले आहे. त्यांचे शिवसेनेशी असलेले जवळचे संबंध याला कारणीभूत ठरले आहेत. भारतीय जनता पक्षानं आणि मनसेने देखील सचिन वाझे यांना लक्ष्य केलं आहे.

कोण आहेत सचिन वाझे?

१९७२ मध्ये जन्मलेले सचिन वाझे हे सध्या महाराष्ट्र पॉलिसीमध्ये कार्यरत आहेत. त्यांना एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून देखील ओळखले जाते. असे बोलले जाते कि त्यांच्या एन्काउंटर स्पेशलिस्ट टीमने ६३ गु न्हेगारांचे एन्काउंटर केले आहे. १९९० मध्ये वाझे हे महाराष्ट्र पोलीसमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून जॉईन झाले. त्यांनी छोटा राजन आणि दा ऊदच्या अनेक सहकाऱ्यांना कं ठस्नान घातले आहे.

१९९० मध्ये वाझे यांना पहिली पोस्टिंग न क्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात मिळाली होती. त्यानंतर १९९२ मध्ये त्यांची ठाण्यात बदली झाली. मोठ्या केस सोडल्यामुळे त्यांचं नाव चर्चेत आलं.

वाझे हे नाव नुकतंच काही दिवसांपूर्वी चर्चेत आलं होतं ते म्हणजे अर्णब गोसावींमुळे. Republic TV चे संपादक अर्णब गोस्वामी यांना त्यांनी घरातून अटक केली होती. गोस्वामींच्या अटकेसाठी तयार केलेल्या टीमचं नेतृत्व सचिन वाझे यांनी केलं होतं.

सचिन वाझे हे पहिल्यांदा वादात अडकले २००२ मध्ये. २००४ मध्ये त्यांच्यासह १४ पोलीस कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्याचं आलं. २००२ घाटकोपर ब्ला स्टचा आ रोपी ख्वाजा यूनिसच्या कस्टोडियल डेथचा आरोप त्यांच्यावर होता. निलंबनाचा काळ संपल्यानंतर त्यांनी नाराज होत २००७ मध्ये पोलीस सेवेचा राजीनामा दिला होता. ३० नोव्हेंबर २००७ रोजी पोलिसाची नोकरी सोडल्यानंतर त्यांनी २००८ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता.

त्यांच्या याच शिवसेनेशी असलेल्या कनेक्शनमुळे त्यांच्यावर सध्या आरोप होत आहेत. १६ वर्षानंतर कोरोना काळात वाझे हे २०२० मध्ये पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले होते.

मनसेने उपस्थित केला वाझेंबद्दल सवाल-

मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, सचिन वाझे ह्यांनी २००८ साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ह्या प्रकरणाचा गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्वाच्या केसेस त्यांच्याकडेच का सोपवल्या जातात??? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात???

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *