शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे आले आदित्य ठाकरेंच्या समोर, आदित्य म्हणाले ‘ताट वाढले होते..’

विधानसभेत भाजप आणि शिंदे गटाने मोठ्या फरकाने जिंकला. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला 164 मते मिळाली. त्याचवेळी महाविकास आघाडीला 99 मते मिळाली. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजयाची घोषणा केली.
शिवसेना कधीही संपणार नाही. शिवसेना दुपटीपेक्षाही जास्त ताकद घेऊन विधानभवनात येईल आणि भगवा फडकवेल, असा विश्वास शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच राज्यात मध्यवर्ती निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. २० मे रोजी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होण्याबाबत विचारलं होते, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.
आदित्य ठाकरे मीडियाशी बोलत असताना अचानक शिंदे गटील आमदार प्रकाश सुर्वे त्यांच्या समोर आले. यावेळी दोघांची भेट झाली. त्यानंतर विधान भवनाबाहेर प्रकाश सुर्वे आणि आदित्य ठाकरे यांच्यात संवाद झाला. माझं तुमच्यावर खूप प्रेम होतं. तुम्हालाही माहिती आहे, असं आदित्य ठाकरे प्रकाश सुर्वेना म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे हे प्रकाश सुर्वेंशी संवाद साधताना भावूक झाल्याचे दिसून आले.
बघा व्हिडीओ-
अधिक वाचा-
‘मातोश्री’वर कधी जाणार आहात?; जाणून घ्या काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
वरिष्ठांनी या कारणामुळे नाकारलं देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद? अमित शाहांसोबतच्या..
फडणवीसांना मुख्यमंत्रीपदापासून दूर केल्याने भाजपमध्ये प्रचंड नाराजी, बॅनरवरून अमित शहा गायब
शिंदे सरकारची संभाव्य मंत्रिमंडळ यादी आली समोर, जाणून घ्या कोणाला मिळणार मंत्रिपद