शिवसेनेची बाजू मांडणाऱ्या कपिल सिब्बल यांची एक दिवसाची फीस ऐकून डोळे पांढरे होतील

देशातील प्रसिद्ध वकील आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर गेले आहेत. त्यांनी काँग्रेस सोडून सपामध्ये प्रवेश केला होता. कपिल सिब्बल हे सध्या शिवसेना फुटीच्या वादात उद्धव ठाकरे गटाची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडत आहेत.
जिथे समाजवादी पक्षाला कपिल सिब्बल यांच्या रूपाने प्रसिद्ध वकील मिळाला, तिथे राज्यसभेतही मोठा आवाज मिळाला. विशेष म्हणजे कपिल सिब्बल हे सपा नेते आझम खान यांचा खटलाही लढवत आहेत. कपिल सिब्बल महाराष्ट्रातील प्रचंड चर्चेत असलेला शिंदे ठाकरे गटाचा खटला देखील लढवत आहेत. ते ठाकरे गटाचे वकील आहेत. प्रसिद्ध वकील कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टातील सुनावणीसाठी किती फी घेतात हे आज जाणून घेऊया.
कपिल सिब्बल एका सुनावणीसाठी किती पैसे घेतात?
2015 मध्ये मिंटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, माजी कायदा मंत्री कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयात एकदा हजर राहण्यासाठी किमान 8 लाख ते 15 लाख रुपये आकारत होते. पण रिपोर्ट्सच्या मते आता सिब्बल सर्वोच्च न्यायालयात प्रत्येक सुनावणीसाठी 20-25 लाखांपर्यंत शुल्क आकारतात. त्याचवेळी उच्च न्यायालयात 9 ते 16 लाख रुपये आकारतात.
कपिल सिब्बल यांना लाभला आहे वकिलीचा वारसा
कपिल सिब्बल यांना वकिलीचा वारसा मिळाला आहे. त्यांचे वडीलही देशातील प्रसिद्ध वकील होते. त्यांना इंटरनॅशनल बार असोसिएशनची लिव्हिंग लिजेंड ऑफ लॉ ही पदवीही मिळाली होती. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कपिल सिब्बल हे देखील आज देशातील प्रसिद्ध वकील आहेत.
सिब्बल यांनी केले आहे अनेक मोठ्या खटल्यांचे प्रतिनिधित्व
कपिल सिब्बल यांनी आजवरच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या खटल्यांची वकिली केली आहे. सध्या ते सपा नेते आझम खान यांच्यासाठी खटला लढवत आहेत. कपिल सिब्बल यांच्या वकिलीचा परिणाम म्हणजे काही दिवसांपूर्वी आझम खान यांना सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाला आणि त्यांची सुटका झाली. या व्यतिरिक्त राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे वकील कपिल सिब्बल आहेत, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात मलिक यांच्या जामिनाचा खटला लढवला. एवढेच नाही तर चारा घोटाळ्याप्रकरणी सिब्बल यांनी राजदचे लालू यादव यांना उच्च न्यायालयातून जामीनही मिळवून दिला होता.
‘पहिल्या प्रेमासाठी’ सोडली आयएएसची नोकरी!
कपिल सिब्बल अभ्यासात खूप तत्पर होते. 1973 मध्ये त्यांनी देशातील सर्वोच्च परीक्षा UPSC उत्तीर्ण केली, परंतु त्यांनी IAS ची नोकरी केली नाही. कारण होतं, त्याचं पहिलं प्रेम म्हणजेच वकिली! होय, कपिल सिब्बल यांना सुरुवातीपासूनच वकिलीची आवड आहे. वकिली हे त्यांचे पहिले प्रेम होते, म्हणूनच सक्रिय राजकारणात येऊनही त्यांनी कधीही कायदा सोडला नाही. केवळ नेता म्हणून त्यांची ओळख नाही, तर देशातील बड्या वकिलांमध्येही त्यांचे नाव सामील आहे. देशातील अनेक मोठ्या आणि कठीण खटल्यांचे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिनिधित्व केले आहे.