बातम्या

शिवसेना संकटात असताना उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारे ते १६ आमदार कोण? जाणून घ्या नावे

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली असून, राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. मात्र, विधिमंडळातील बहुमत चाचणीच्या विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज ५ वाजता सुनावणी होणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी काल रात्री मुंबईत राज्यपालांची भेट घेतली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बहुमत चाचणीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात राजकीय भूकंप झाल्याचे दिसून आले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे बहुतांश आमदार फुटल्याने पक्षाला धक्का बसला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाच्या विचारसरणीशी तडजोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. त्याचवेळी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको, अशी भूमिका घेत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे.

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर आलेल्या या संकटात शिवसेनेच्या ३९ आमदारांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली आहे. तर अवघे १६ आमदार हे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. जाणून घेऊया कोण आहेत हे १६ आमदार.

उद्धव ठाकरेंसोबत असलेले आमदार कोण?

१. आदित्य ठाकरे(वरळी मतदारसंघ) २. अजय चौधरी (शिवडी मतदारसंघ) ३. रमेश कोरगावकर (भांडुप पश्चिम मतदारसंघ)

४. वैभव नाईक (कुडाळ मतदारसंघ) ५.रवींद्र वायकर (जोगेश्वरी पूर्व मतदारसंघ) ६.उदयसिंह राजपूत (कन्नड मतदारसंघ)

७. संतोष बांगर (हिंगोली मतदारसंघ) ८. भास्कर जाधव (गुहागर मतदारसंघ) ९. सुनील राऊत (विक्रोळी मतदारसंघ)

१०. राजन साळवी (राजापूर मतदारसंघ) ११. नितीन देशमुख (बाळापूर मतदारसंघ) १२. कैलास पाटील (उस्मानाबाद मतदारसंघ)

१३. राहूल पाटील (परभणी मतदारसंघ) १४. सुनील प्रभू (दिंडोशी मतदारसंघ) १५. प्रकाश फातर्पेकर (चेंबूर मतदारसंघ)

१६. संजय पोतनीस (कलिना मतदारसंघ)

हे हि वाचा-

एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होण्यासाठी 50 कोटींची ऑफर आल्याचा या आमदाराचा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदेंचे बंड ED मुळे आहे अशी चर्चा ज्या सचिन जोशींमुळे झाली ते नेमके आहेत कोण?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button