बातम्याराजकिय

हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसकडून चर्चेत आहेत ही 3 नावे

शिमला मध्ये काँग्रेसने आज शुक्रवार दुपारी 3 वाजता आपल्या नवनिर्वांचीत आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत त्यांच्या सर्व आमदारांचा समावेश आहे. या बैठकीत प्रदेश काँग्रेसचे प्रभारी राजीव शुक्ला व पर्यवेक्षक भूपेश बघेल व भूपेंद्र हुंडा हे देखील हजेरी लावतील.

हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीच्या निकालानंतर आता सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला वेग आला असून, प्रथा पाळत राज्यातील जनतेने यावेळी सत्तेची चावी काँग्रेस पक्षाकडे दिली आहे. 68 विधानसभेच्या जागा असलेल्या रायमध्ये काँग्रेसने 40 जागा जिंकल्या आहेत, तर भाजपला 25 जागांवर समाधान मानावे लागले असून तीन जागा अन्यच्या खात्यात गेली आहेत.

या बैठकीत उपस्थित असणार आहेत राजू शुक्ला भूपेंद्र हुडा आणि भूपेश बघेल 

हिमाचल प्रदेशातील कॉंग्रेसचा सर्वात मोठा आणि सर्वात सामान्य चेहरा माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा होता. त्यांच्या निधनानंतर पक्षाने राज्यातील ही पहिलीच निवडणूक लढवली होती.निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीच्या वेळी पक्षाने आपल्या वतीने कोणतेच नाव जाहीर केले नाही.ही निवडणूक सामूहिक नेतृत्वाखाली लढली गेली आणि आता निवडणूक जिंकल्यानंतर पक्षाला विधिमंडळ पक्षाचा नेता निवडायचा आहे.त्यासाठी आज शिमल्यात विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला हिमाचल प्रदेश काँग्रेसचे प्रभारी राजीव शुक्ला आणि पर्यवेक्षक भूपेश बघेल आणि भूपेंद्र हुडा हे देखील उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहेत ही 3 नावे

हिमाचल काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिभा सिंह या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.प्रतिभा सिंह यांच्याशिवाय इतर तीन ते चार नेतेही या शर्यतीत सामील आहेत.ही निवडणूक वीरभद्र सिंह यांच्या नावावर जिंकली होती, असं प्रतिभा सिंह म्हणाल्या होत्या, तुम्ही तुमच्या घराण्याचा वारसा दुर्लक्षित करू शकता का? प्रतिभा सिंह यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय खळबळ वाढली आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आणखी एक नाव चर्चेत आहे वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह. विक्रमादित्य सिंह सिमला ग्रामीण मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. तरुणांना जोडण्यासाठी विक्रमादित्य यांनी निवडणुकीपूर्वी राज्यभर रोजगार संघर्ष दौरा केला होता. विक्रमादित्य तरुण आहेत आणि हे करून पक्ष तरुणांना नवा संदेश देऊ शकतो. हिमाचलमधील सीएम शर्यतीतील तिसरे नाव म्हणजे मुकेश अग्निहोत्री.गेल्या ५ वर्षांपासून मुकेश यांनी हिमाचल प्रदेश विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावली आहे.याशिवाय ते 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button