बातम्या

शिंदे सरकारची संभाव्य मंत्रिमंडळ यादी आली समोर, जाणून घ्या कोणाला मिळणार मंत्रिपद

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सर्वाना आश्चर्याचा धक्का देत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने राज्यातील सत्तासंघर्ष अखेर संपुष्टात आला. महाराष्ट्रात गेले काही दिवस अनेक धक्के आणि अनपेक्षित घटनांनी भरलेले सत्तानाट्य अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने संपुष्टात आले. याआधी सरकारमधून सामील होणार नाही अशी घोषणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना वरिष्ठांच्या सांगण्यावरून थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली.

शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री थेट गोव्यात पोहोचून आमदारांसोबत आनंदोत्सव साजरा केला. समर्थक आमदारांना भेटल्यानंतर शिंदे आज मुंबईत पोहोचणार आहेत. रविवारपासून विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन होणार आहे. बहुमत चाचणीसोबतच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही होणार आहे. सरकारपेक्षा ठाकरेंच्या शिवसेनेची या अधिवेशनात कसोटी लागणार आहे.

शिंदे आणि फडणवीस यांच्या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात बंडखोरांसह एकूण 35 मंत्री असतील. त्यापैकी 12 बंडखोर आमदारांना मंत्री केले जाऊ शकते, तर भाजपच्या कोट्यातून 24 चेहऱ्यांना संधी मिळू शकते.

भाजपच्या कोट्यातून कोणाची वर्णी?

भाजपकडून कॅबिनेट मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे, विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील किंवा राम शिंदे, संभाजी पाटील निलंगेकर, मंगल प्रभात लोढा
संजय कुटे, रविंद्र चव्हाण, डॉ. अशोक उइके, सुरेश खाडे, जयकुमार रावळ, अतुल सावे, देवयानी फरांदे, रणधीर सावरकर, माधुरी मिसाळ

तर राज्यमंत्री म्हणून प्रसाद लाड, जयकुमार गोरे, प्रशांत ठाकूर, मदन येरावार, महेश लांडगे किंवा राहुल कुल, निलय नाईक, गोपीचंद पडळकर, बंटी बंगाडिया यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

शिंदे गटाकडून कोणाला संधी?

महाविकास आघाडीत असताना शिंदे गटातील 9 मंत्र्यांची खाती काढून घेण्यात आली होती. त्या सर्व मंत्र्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. तर 6 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्री करण्यात येणार आहेत. शिंदे गटातील संभाव्य मंत्र्यांमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, बच्चू कडू, संजय राठोड, शंभूराज देसाई यांना संधी मिळणार आहे.

तर राज्यमंत्री म्हणून दीपक केसरकर, संदिपान भुमरे, संजय शिरसाट, भरत गोगावले, तानाजी सावंत यांना संधी मिळणार आहे. दरम्यान, नव्या सरकारच्या बहुमत चाचणीसाठी आता अधिवेशन 2 आणि 3 जुलै ऐवजी 3 आणि 4 जुलै रोजी होणार आहे.

हे हि वाचा-

फडणवीसांना मुख्यमंत्रीपदापासून दूर केल्याने भाजपमध्ये प्रचंड नाराजी, बॅनरवरून अमित शहा गायब

शिवसेना संकटात असताना उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारे ते १६ आमदार कोण? जाणून घ्या नावे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button