विवाहित असूनही एकमेकांच्या प्रेमात पडले, किरण-अनुपम खेर यांची प्यारवाली लव्हस्टोरी!

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री किरण खेर यांचा जन्म 14 जून 1952 रोजी पंजाबमध्ये झाला. बॉलीवूडच्या आवडत्या आईबद्दल बोलायचे झाल्यास किरण खेरचे नाव प्रत्येकाच्या जिभेवर येते. किरण खेरने चित्रपटांसह अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. चित्रपटांमध्ये काम करत असताना किरण खेर अनुपम खेरच्या प्रेमात पडल्या. त्यांनी नंतर त्यांच्या पतीला घटस्फोट दिला आणि अनुपम खेरशी लग्न केले
अनुपम खेर आणि किरण खेर यांची प्रेमकहाणी बॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नाही. कारण जेव्हा ते एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा त्यांचे आधीच लग्न झालेले होते. किरण आणि अनुपम खेर त्यांच्या पहिल्या लग्नामुळे नाखूष होते, पण त्यांना एकमेकांमध्ये आनंद दिसला आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
थिएटर मध्ये झाली भेट
किरण आणि अनुपम यांची भेट चंदीगडमधील एका थिएटरमध्ये झाली. तिथे त्यांची खूप चांगली मैत्री झाली. दोघांनाही एकमेकांबद्दल सर्व काही माहित होते, पण हे माहित नव्हते की ही मैत्री नंतर प्रेमात बदलणार आहे. आपले नशीब आजमावण्यासाठी किरण 1980 मध्ये मुंबईत आल्या होत्या. यावेळी त्यांची भेट बिझनेसमन गौतम बेरीशी झाली आणि त्या त्यांच्या प्रेमात पडल्या. या जोडप्याने लग्न केले आणि त्यांना एक मुलगा झाला. किरण आणि गौतमच्या मुलाचे नाव ‘सिकंदर’ आहे.
गौतम आणि किरण यांचा प्रेमविवाह झाला होता, पण या नात्यात ते सुखी नव्हते. त्यांनी आपले थिएटर चालू ठेवले. त्याचवेळी अनुपम खेर हे देखील विवाहित होते आणि त्यांच्या लग्नावर ते खुश नव्हते. लग्नामुळे अडचणीत आलेले अनुपम आणि किरण थिएटरमध्ये सोबत काम करत होते.
अनुपम खेर आणि किरण एकदा एका नाटकासाठी कोलकात्यात गेले होते. जिथे दोघे पहिल्यांदा प्रेमात पडले. अनुपम माझ्या खोलीतून परत येत असताना त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि आम्हा दोघांना काहीतरी विशेष वाटले, असे किरण खेर सांगतात.
प्रेमाची जाणीव झाल्यानंतर अनुपम खेर यांनी त्यांच्या मनातल्या भावना किरण यांच्याशी बोलण्यात जास्त वेळ घालवला नाही. एके दिवशी ते किरणच्या घरी गेले आणि तिला म्हणाले, मला तुला काही सांगायचे आहे. त्यानंतर अनुपम यांनी किरणवर प्रेम व्यक्त केले. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
किरणने तिचा नवरा आणि अनुपम खेर यांनी त्यांची पत्नीला घटस्फोट दिला आणि 1985 मध्ये त्यांनी लग्न केले. अनुपम खेर यांनी त्यांचे नाव किरण खेर यांच्या मुलाला दिले.