प्रेरणादायी

वर्षभर एकच फळ विकून करोडपती बनते हे गाव, आशियातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून बनली ओळख

आशियातील सर्वात श्रीमंत गाव आपल्या भारतात आहे, हे वाचून आश्चर्य वाटू देऊ नका. होय हे खरं आहे आणि हे गाव फक्त एकच फळ विकून करोडपती बनते. हे गाव आहे आपल्या हिमाचल प्रदेशमध्ये. हिमाचल प्रदेशमध्ये फळबागांसाठी पोषक असे वेगळे विशेष वातावरण आहे. या वातावरणाचा फायदा घेत या गावातील शेतकऱ्यांनी करोडपती बनवणारी शेती सुरु केली आहे. जाणून घेऊया या करोडपती गावाबद्दल..

हिमाचल प्रदेश हे ‘सफरचंद’मुळे जगभरात ‘ऍपल स्टेट’ म्हणून ओळखले जाते. तसेच या सफरचंदामुळे शिमला जिल्ह्यातील चौपालच्या मडावग गाव आशियातील सर्वात श्रीमंत गाव बनले आहे. मडावगचे प्रत्येक सफरचंद उत्पादक शेतकरी कुटुंब करोडपती झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मडावगमधील प्रत्येक कुटुंबाचे सरासरी वार्षिक उत्पन्न 35 लाख ते 80 लाखांच्या दरम्यान आहे. उत्पादनात वाढ किंवा घट सफरचंदाच्या पिकावर आणि किंमतीवर अवलंबून असते. मडावगमध्ये 225 हून अधिक कुटुंबे आहेत. येथील फळबाग मालक दरवर्षी सरासरी 150 ते 175 कोटी रुपयांची सफरचंद विकत आहेत.

क्यारी हे होते सर्वात श्रीमंत गाव

मदावागपूर्वी शिमला जिल्ह्यातील क्यारी गाव सर्वात श्रीमंत होते. सफरचंदांमुळे क्यारी हे आशियातील सर्वात श्रीमंत गाव बनले होते. आता मडावगला आशियातील सर्वात श्रीमंत गाव म्हटले जाते. कारण त्यांनी क्यारी ला उत्पनाच्या बाबतीत मागे टाकले आहे.

आता दाशोली गाव उदयास येऊ लागले-

आता मडावगचे दाशोली गावही सफरचंदांसाठी राज्यात ओळख निर्माण करत आहे. दाशोली गावातील 12 ते 13 कुटुंबांनी देशातील सर्वोत्तम सफरचंदांचे उत्पादन सुरू केले आहे. दाशोलीच्या छोट्या बागायतदाराकडूनही 700 ते 1000 पेटी सफरचंदांचे तर मोठे बागायतदार 12 हजार ते 15 हजार पेटी सफरचंदांचे उत्पादन घेत आहेत.

8000 फूट उंचीवर सफरचंदाच्या बागा
दाशोलीतील बागायतदारांच्या बागा 8000 ते 8500 फूट उंचीवर आहेत. सफरचंद लागवडीसाठी ही उंची सर्वोत्तम मानली जाते. सफरचंदासाठी असणारे पोषक वातावरण या भागात आहे. याचाच फायदा घेऊन हे गावे करोडोची उलाढाल करत आहेत.

शिमल्यापासून मडावग ९० किमी
मदावग हे गाव शिमला जिल्ह्यातील चौपाल तालुक्यात येते. शिमल्यापासून ९० किमी अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या 2200 पेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. मडवगमध्ये सर्वांनी आलिशान घरे बांधली आहेत. सफरचंद लागवडीसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

जम्मू काश्मीरच्या सफरचंदांनाही मागे टाकले-

मडवग गाव आणि संपूर्ण पंचायत सफरचंद लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. पण, मडावगचे दशोली सफरचंद दर्जेदार किन्नोर आणि जम्मू काश्मीरच्या सफरचंदांनाही मागे टाकत आहे. त्यामुळे मडावग आणि दशोली सफरचंद राज्यात आणि देशाच्या इतर भागांमध्ये बाजारात हातोहात विकले जातात. परदेशातही मडावच्या सफरचंदांना मोठी मागणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button