बातम्या

वरिष्ठांनी या कारणामुळे नाकारलं देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद? अमित शाहांसोबतच्या..

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही राज्यातील राजकीय घडामोडींचा वेग कमी होताना दिसत नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नवीन सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर आता विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद दिल्याने पक्षाच्या आदेशावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर्गत वादामुळे फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकले नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत नव्या सरकारवर टीका केली आहे. नवा मुख्यमंत्री शिवसेनेचा नाही. तुम्हाला तेच करायचे होते, मग 2019 मध्ये का नाही? भाजपने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. अमित शहा यांच्याशी झालेल्या वादामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद नाकारण्यात आले का, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला.

आमचे खूप जवळचे नाते आहे. पक्षासाठी मान कापून देण्याची तयारी आमच्यात असते असे ते म्हणाले. दरम्यान फडणवीस यांचे पंख छाटण्यामागे फडणवीस यांचं भाजपमध्ये वाढत चाललेलं वजन असल्याचं सांगितलं जात आहे. २०१४ मध्ये सत्ता आल्यापासून महाराष्ट्रातील सर्व सूत्रे फडणवीस यांनी ताब्यात घेतली.

त्यांनी इतर पक्षातील मोठ्या नेत्यांना पक्षात आणून स्वतःच वजन अधिक वाढवलं. पण भाजप हा एकाधिकारशाहीवर चालणार पक्ष नसल्याने त्यांच्या पक्षातील एकाधिकारशाहीवर नाराजी वाढत होती. मागील काही वर्षात राज्य भाजपमध्ये सगळीकडे फडणवीस हेच नाव होतं. विधानपरिषदेसाठी फक्त फडणवीस गटाच्या लोकांनाच तिकीट मिळत होतं, फक्त फडणवीस गटाच्या लोकांनाच राज्यसभेचं तिकीट मिळत होतं. फडणवीस यांनी पक्षातील इतर प्रतिस्पर्ध्यांना संपवल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला. तसेच एकनाथ खडसे यांनी भाजप सोडण्यात, तावडे हे राष्ट्रीय राजकारणात जाण्यात, पंकजा यांचे पंख छाटण्यात फडणवीस असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात आहेत.

पण हे सर्व करत असताना कुठेतरी केंद्रीय पातळीवर फडणवीस यांचा उल्लेख भावी पंतप्रधान, सक्षम नेता असाही झाला. कदाचित त्यामुळेच केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना रसद पुरविण्यात मर्यादा आणल्याचे बोलले जात आहे. अमित शहा हे भाजपचे पुढचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असू शकतात. पण त्यांना देवेंद्र फडणवीस हे तगडे आव्हान मिळू शकते. त्यामुळे अमित शहांनी फडणवीसांचा गेम केला अशी चर्चा सध्या चालू आहे.

भाजपमध्ये सर्व बंद दाराआड ठरतं. पण देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ते सरकारमध्ये शामिल होणार नाहीत असं सांगितल्यानंतर दिल्लीतून पक्षाच्या अध्यक्षांनी त्यांना उपमुख्यमंत्री होण्यासाठी आदेश देणं हे बरंच काही सांगणारं आहे. हे देवेंद्र फडणवीसांचं खच्चीकरण आहे असं मानलं जात आहे. फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा त्याग केल्याचं जाहीर केल्यावर त्यांची प्रतिमा उचांवणारी होती. ते कदाचित केंद्रीय नेतृत्वाला आवडलं नसेल. हे एक प्रकारे फडणवीसांचं खच्चीकरण आहे. एवढ्या मोठ्या क्षमतेच्या माणसाला मुख्यमंत्रिपद नाही आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करायला लावणं म्हणजे त्यांच्या क्षमतांचं अवमूल्यन आहे.

फडणवीस नागपूरचे असल्याने आणि संघाचे कट्टर सेवक असल्याने त्यांना भविष्यात संघाकडूनही मोठं पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. हे देखील कारण लक्षात घेऊन त्यांचे पंख छाटले असावेत असं जेष्ठ पत्रकार सांगतात.

हे देखील वाचा-

शिंदे सरकारची संभाव्य मंत्रिमंडळ यादी आली समोर, जाणून घ्या कोणाला मिळणार मंत्रिपद

फडणवीसांना मुख्यमंत्रीपदापासून दूर केल्याने भाजपमध्ये प्रचंड नाराजी, बॅनरवरून अमित शहा गायब

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button