बातम्या

वयाच्या 21 व्या वर्षी गुगलचा योग्य वापर कसा करतात शिका या तरुणाकडून, वर्षाला कमावतो 2 करोड रुपये..

कॉम्पुटर आणि इंटरनेट ही अशी गोष्ट आहे त्याचा योग्य वापर केला तर आपलं आयुष्य बदलू शकते. पण याचा चुकीचा वापर आयुष्य व्यर्थ घालण्यासाठी पुरेषे आहे. पण कन्नूर केरळ येथील एका अवघ्या 21 वर्षाच्या तरुणाने कॉम्पुटर आणि इंटरनेटचा वापर करून आपल्या आयुष्याला कलाटणी दिली आहे. या तरुणाचे नाव आहे मोहम्मद जवाद टीएन. जवादला त्याच्या वडिलांनी लहानपणी एक कॉम्पुटर गिफ्ट दिले होते ज्याचा वापर करून त्याने आपलं भविष्य घडवलं आहे. जवाद आता एका वेगळ्याच उंचीवर पोहचला आहे.जवादने आपल्या मेहनतीने खुप कमी वयातच एक यशस्वी इन्ट्रोरप्रिनोर म्हणून ओळख निर्माण केली आहे. आज जवाद हा TNM Online Solutions या इकॉमर्स, वेब डिझायनिंग आणि अँप डेव्हलपमेंट करणाऱ्या MNC कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. जवाद मालक असलेल्या या कंपनीची वर्षाची कमाई तब्बल 2 कोटी आहे. मोहम्मद जवादचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. बघूया त्याच्या यशापर्यंत पोहचण्याचा प्रवास थोडक्यात खासरेवर..

वडिलांनी गिफ्ट दिलेल्या कॉम्पुटरचा जवादने पूर्णपणे योग्य आणि जास्तीत जास्त वापर केला. कॉम्पुटरसोबत त्याला इंटरनेट कनेक्शन सुद्धा वडिलांनी दिले होते. जवादच्या वडिलांनी त्याला जीमेलची आयडी2उघडून दिली होती. TNM Jawad हे युजर नेम उपलब्ध असल्याने तेव्हापासून तो हेच नाव वापरत आला आहे. जवाद तेव्हा शाळेतून आल्यानंतर तासनतास कॉम्पुटरवर घालायचा. त्यावेळी ऑर्कुट हे खूप प्रसिद्ध होते. तो नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रयत्न करत असे.

त्याने गुगलचा योग्य वापर करत इंटरनेटवरून फ्री मध्ये ब्लॉगिंग आणि वेब डिझायनिंग शिकून घेतले. त्यावेळी तो फक्त 10 वी मध्ये होता. त्याने दहावीत असतानाच आपला मित्र श्रीरंग सोबत एक वेबसाईट लाँच केली. दोघांना वेब डिझायनिंगचे तेंव्हापासूनच खूप वेड लागले. डॉट कॉम डोमेन घ्यायला पैसे देखील त्यांच्याकडे नसायचे, त्यामुळे ते फ्री डोमेनवर काम धकवून न्यायचे. जवादच्या तेव्हाच लक्षात आले की वेब डिझायनिंग मध्ये चांगला स्कोप आहे. त्याने आपले पहिले डोमेन TNM ONLINE SOLUTION रजिस्टर केले आणि एक वर्चुअल कंपनी सुरू केली. फेसबुकचा वापर करून त्याने सुरुवातीला 1000 रुपयात वेबसाईट बनवून देण्यास सुरुवात केली.

पुढे कंपनी वाढत गेली आणि जवादने यशाकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली. जवादने 2013 मध्ये साऊथ बाजारात आपले छोटे ऑफिस चालू केले. जवादच्या या यशात वाडीलांप्रमाणे आईचा पण खूप मोठा वाटा आहे. त्याच्या सुरुवातीच्या दिवसात आईने त्याला भक्कम साथ दिल्यानेच इथपर्यंत पोहोचल्याचे तो सांगतो. केरळ मध्ये त्यांच्या कंपनीने हजारहुन अधिक क्लाइन्ट सोबत काम केले आहे. आज 21 वर्षीय जवाद 18 पेक्षा अधिक देशातील क्लाइन्टसोबत काम करतो. नुकतेच त्याने आपल्या कंपनीचे दुबईमध्ये देखील ऑफिस उघडले आहे.गुगलचा आणि इंटरनेटचा योग्य वापर केल्यावर यश मिळवणे कठीण नसल्याचे जवादने दाखवून दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button