Breaking News
Loading...
Home / बातम्या / ज्या मुलाला वडिलांनी ज्यूसबार चालवून शिकवलं तो मुलगा आज IPS आहे!

ज्या मुलाला वडिलांनी ज्यूसबार चालवून शिकवलं तो मुलगा आज IPS आहे!

सध्याच्या घडीला गरीब परिस्थितीतून पुढे जाऊन यशस्वी होणाऱ्या उद्योजक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची संख्या पण समाजात वाढत असल्याचे दिसून येत आहे. आयपीएस अतुल झेंडे यांचा जीवनप्रवास खूपच हलाखीचं होता. त्यांचे वडील उत्तमराव झेंडे यांनी तिसरीमधूनच शिक्षणाला रामराम ठोकला होता. आणि त्यानंतर त्यांनी खडतर परिस्थितून मुलांना शिक्षण दिले.

त्यांनी प्रथमतः ज्यूस बार आणि आईस्क्रीम बार चालू केला. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी मुलांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांची मुले खूप हुशार होती. अतुल पण लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. अतुल दहावीमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. अतुल यांनी कमी वयातच घराची जबाबदारी घेण्याचे मनाशी ठरवले.

Loading...

अतुल यांच्या आई वडिलांचे शिक्षण फारच कमी झालेले होते. त्यांच्या वडिलांचे तिसरीपर्यंत आणि आणि आईचे सहावीपर्यंत शिक्षण झालेले होते. त्यांच्या आई वडिलांनी मुलांच्या शिक्षणात परिस्थितीला कधीच आड येऊन दिले नाही. आई वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतुल यांनी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी पुण्यात ऍग्रीकल्चरचे शिक्षण घेतले.

जेव्हा अतुल यांचे ऍग्रीकल्चरचे शिक्षण चालू होते तेव्हाच त्यांचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू होता. त्यांचे २००७ साली एका गुणाने त्यांची एमपीएससी परीक्षेची संधी हुकली. त्यांचा अधिकारी बनण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. सध्या अतुल झेंडे हे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची काही दिवसांपूर्वी सोलापूर ग्रामीणमधून रायगड मध्ये बदली झाली आहे.

अतुल झेंडे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील दिवे हे आहे. अनेक जणांसाठी अतुल झेंडे हे आदर्श ठरले आहेत. गरिबीतून अधिकारी झालेले अतुल झेंडे हे एक प्रेरणादायी अधिकारीच आहेत. अतुल यांच्या ग्रुमधील जवळपास २१ जणांनी एमपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांनी एमपीएससी मधून डीवायएसपी पदासाठी निवड झाली होती. सध्या ते रायगड जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

Loading...
Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *