Breaking News
Loading...
Home / प्रेरणादायी / लोणचे बनवणाऱ्या वडिलांच्या मुलीने सुरु केला व्यवसाय; ३ वर्षात कमावले चक्क १ कोटी रुपये

लोणचे बनवणाऱ्या वडिलांच्या मुलीने सुरु केला व्यवसाय; ३ वर्षात कमावले चक्क १ कोटी रुपये

अनेकांच्या घरी आपला खानदानी व्यवसाय सुरु असतो. असे असतानाही काहींना आपला वडिलोपार्जित अथवा खानदानी व्यवसाय सांभाळता येत नाही. अशी अनेक उदाहरणे आपल्याला समाजात बघायला मिळतील. काहींना कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना देखील कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर काही लोक व्यवसाय उभे करतात आणि त्यामध्ये यशस्वी होतात.

दिल्लीत वाढलेल्या आणि लंडन येथे व्यावसायिक पदवी घेतलेल्या निहारिका भार्गवचीदेखील अशीच काहीशी कथा आहे. निहारिकाच्या वडिलांना लोणचे बनवण्याची आवड होती. आपल्या नातेवाईकांना भेट म्हणून ते स्वतः तयार केलेले लोणचे देत असत. त्यांचे लोणचे अत्यंत चविष्ट असल्याने अनेकजण त्यांच्याकडे लोणच्याची मागणी करू लागले.

Loading...

निहारिकाने जेव्हा आपले शिक्षण पूर्ण केले आणि भारतात आली तेव्हा तिला तिच्या आवडीतून आपण काहीतरी मोठा व्यवसाय करू शकतो हे लक्षात आले. शुद्ध आणि घरगुती लोणच्याला सध्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे आणि हेच निहारिकाने रिसर्च केले. सुरुवातील दिल्ली आणि जवळपासच्या भागात तिने छोटे छोटे स्टॊल लावण्यास सुरुवात केली.

लोकांनीही चांगला प्रतिसाद दिल्याने तिने हळू हळू बाजारपेठेत लोणचे पुरवण्यास सुरुवात केली. लोणच्याचा व्यवसायात चांगला नफा मिळू लागल्याने आणि मागणीही जास्त वाढल्याने २०१७ साली निहारिकाने द लिटिल फार्म कंपनी या नावाने गुरगावमध्ये एक कंपनी सुरु केली. यामध्ये तिने ऑनलाईन उत्पादने देखील विकायला सुरुवात केली.

तीन वर्षात निहारिकच्या कंपनीचा टर्न ओव्हर हा तब्ब्ल १ कोटी रूपयांपर्यंत गेला आहे. सध्या द लिटिल फार्म कंपनीमध्ये ५० पेक्षा जास्त प्रकारचे लोणचे विकले आहे. आंब्याच्या लोणच्याची मागणी सर्वात जास्त आहे. त्याचप्रमाणे तिची कंपनी हळद, कच्चे घाण्याचे तेल, जॅम, मिरची पावडर यांसारखे उत्पादनं देखील मोठ्या प्रमाणावर विकते आहे.

Loading...

निहारिकाने आपल्या उत्पादनांमधील बारकावे लक्षात घेऊन मध्यप्रदेशात असणाऱ्या आपल्या वडिलांच्या नावे असणाऱ्या ५० एकर शेतजमिनीवर आंबे, आवळे, लिंबू, हळद, आले, मिरची ही पिके घेण्यास सुरुवात केली आहे. या सर्व पिकांचा वापर लोणचे बनवण्यासाठी केला जातो. दरवर्षी सरासरी ३० टनांपेक्षाही जास्त उत्पादन याठिकाणी घेण्यात येते. शिवाय कोणतेही रासायनिक कीटकनाशके न वापरता जैविक खतांचा वापर करून निहारिका पिकांची लागवड करते.

Loading...

About Khaasre Team

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *